आंबिवली च्या स्मशान भुमी कडे जाणारा रस्ता खचला
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
माजगांव - आंबिवली : २१ ऑगस्ट,
मानवी मृत्यूचे चिरण स्थान असलेल्या स्मशान भुमी कडे पाहिले जाते.मात्र जुलै महिन्यात पावसांने तांडव केल्यामुळे स्मशान भुमी कडे जाणारा रस्ता खचला गेल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी घेवून जातांना ग्रामस्थांची मोठी तारांबळ उडत आहे,या ठिकाणी ओढा असल्यामुळे मो-या टाकण्यात आल्या होत्या, मात्र पावसामुळे जमिन ओळी झाली आणी हा रस्ता खचला गेल्यांचे निदर्शनास येत आहे.
पावसामुळे तालुक्यातील रस्त्याची दुरवस्था निर्माण झाली असून,काही ठिकाणी रस्तावर खड्डे ,पडल्यांचे निदर्शनास येत आहे.सदर आश्या घटना संबधित अधिकारी,ग्रामपंचायत या कडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्यांचे निदर्शनास येत आहे.आंबिवली येथे ओढ्याच्या ठिकाणी ही स्मशान भुमी असून सावरोली - खारपाडा रस्त्यालगत असून थोडे अंतर चालावे लागते.सदर याच ठिकाणी रस्ता खचल्यामुळे अंतिम संस्कारासाठी लागणारे लाकडे वाहून नेण्यांची वेळ ग्रामस्थ यांच्यावर आली आहे.
ह्या स्मशान भुमी जवळ वहान जात होती.मात्र रस्ता खचल्यामुळे कोणतेही सामान जात नसून या साठी शारीरिक श्रम करावे लागत आहे.सदर ह्या ठिकाणी मोरी खचून खड्डा पडला असून,तातडीने या ठिकाणी उपाय योजना करावी अशी मागणी सध्या ग्रामस्थ करीत आहे.
0 Comments