वैशालीताई नितीन महाब्दी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून,राजिप शाळा पौध अदिवासी वाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

 वैशालीताई नितीन महाब्दी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून,राजिप शाळा पौध अदिवासी वाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप 




पाताळगंगा न्यूज  : वृत्तसेवा
पौध  : १३ ऑगस्ट,

               आज प्रत्येकजण वाढदिवस विविध माध्यमातून साजरा केला जात असतो.मात्र समाज्यामध्ये असे काही व्यक्ती आहेत, की दर वर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा केला जात असतो,ग्रूप ग्राम पंचायत माजगांव मा.उपसरपंच नितिन महाब्दि त्यांच्या पत्नी वैशाली महाब्दि हिच्या वाढदिवसांचे  औचित्य साधून रायगड जिल्हा परिषद शाळा पौध आदिवासी वाडी येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल असे शैक्षणिक साहित्य  वाटप करण्यात आले.
               

   ग्रूप ग्राम पंचायत माजगांव या परिसरात पौध अदिवासी वाडी असून या ठिकाणी अदिवासी बांधवांची मुले शाळेय शिक्षण घेत असतात.दर वर्षी प्रमाणे नितिन महाब्दि यांच्या पत्नीचे वाढदिवस हा शाळकरी मुलासमवेत साजरा केला जात असतो. यावेळी विद्यार्थ्यांना दप्तर, वॉटर वह्या, रजिस्टर, चित्रकला वही, कलर खडू,पेन्सिल बॉक्स,टिफिन रायटिंग पॅड तसेच विद्यार्थ्यांना व पालकांना नाष्टा अदि देण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानांचे हास्य पहावयास मिळाले.
     

                डोंगराळ भागात राहणारी मुले यांची स्थिती उत्तमच आहे.असे नाही मात्र या मुलांच्या शाळेय शिक्षणांसाठी लागणारा हातभार लावले जात असल्यामुळे पालकांना पालकांची चिंता कमी होत असते.दर वर्षीप्रमाणे वैशाली ताई या शाळेतील विद्यार्थ्यांना खूप काही देत असल्यामुळे आम्ही त्यांचे ऋणी असल्यांचे शिक्षकांनी बोलले.यावेळी मा.सरपंच गोपीनाथ जाधव,मा. उपसरपंच कल्पनाताई वाघे  मा. उपसरपंच  नितीन महाब्दी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा निशाताई वाघे,वैभव दिवाणे,रुपाली भोसले,शिक्षका रत्ना ठाणगे ( पाटील ) व पालक वर्ग आणि व्यवस्थापन समितीचे सदस्य  यांनी उपस्थित होते.


 

Post a Comment

0 Comments

विकास कामाच्या जोरावर महेश बालदि पुन्हा आमदार होणार मा.सरपंच माजगांव- गोपीनाथ जाधव