दिव्यांग विद्यार्थ्यांनीनी बांधल्या पोलीसदादांना राख्या!
जयवंत माडपे ( पाताळगंगा न्यूज )
खोपोली : २९ ऑगस्ट
सदैव ऑन ड्युटी 24 तास असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनासह इतर सण साजरा करता येत नाही. या पार्श्वभूमीवर रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून खोपोली पोलीस ठाण्यात शालोम एज्युकेशन सेंटर संचालित सोफीया दिव्यांग शाळेच्या विद्यार्थिनींनी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.
शाळेच्या मुख्याध्यापिका शुभा पाटणकर, यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग विद्यार्थिनीनीसाठी छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पहावयाला मिळाला.
याप्रसंगी खोपोली पोलीस ठाण्याचे पो.नि. शितलकुमार राऊत, स.पो.नि. प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक अभिजीत व्हराबळे, अलोक खिसमतराव, सुधाकर लहाणे, कर्मराज गावडे, सहाय्यक फौजदार सागर शेवते, सचिन घरत, प्रसाद पाटील, किरण शिर्के, तडवी, वसंत जाधव, भारती नाईक, स्नेहल घरत, प्रांजली पाटील, तसेच शाळेच्या शिक्षिका साक्षी पवार, मंजू बोडके, सहाय्यक जयकुमार म्हात्रे, कर्मचारी रुचिता सावंत, दुर्गा दबडे उपस्थित होत्या. फोटो कॅप्शन: पोलीस अधिकाऱ्यांना राखी बांधताना मुख्याध्यापिका शुभदा पाटणकर, व दिव्यांग विद्यार्थिनी.
0 Comments