संसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यांच्या स्थानिक विकास निधीमधून परदेशी आळीतील काँक्रीटीकरण करण्यात आलेल्या रस्त्याचे लोकापर्ण;पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे यांच्या पाठपुराव्याला यश

 संसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यांच्या स्थानिक विकास निधीमधून परदेशी आळीतील काँक्रीटीकरण करण्यात आलेल्या रस्त्याचे लोकापर्ण;पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे यांच्या पाठपुराव्याला यश



संजय कदम : ( पाताळगंगा न्यूज )
पनवेल : २९ ऑगस्ट

            मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या स्थानिक विकास निधीमधून पनवेल शहरातील परदेशी आळीतील रस्त्याचे काँक्रीटीकरण कऱण्यात आले असून या रस्त्याचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले आहे. या कामासाठी शिवसेना पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे यांनी पाठपुरावा केला होता.
                  मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या स्थानिक विकास निधीतून पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे यांच्या पाठपुराव्याने परदेशी आळी येथील अष्टविनायक कॉलनी कडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण होऊन खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत महानगरप्रमुख ऍडव्होकेट. प्रथमेश चंद्रशेखर सोमण,  रायगड जिल्हा सल्लागार रमेशदादा गूडेकर व महेश सावंत यांच्या हस्ते रस्त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. तसेच अशा प्रकारच्या विविध विकासकामांसाठी शिवसेना प्रयत्नशील राहील असा विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.
                बरेच वर्ष दुर्लक्षित असलेल्या रस्त्याच्या कामासाठी निधी देऊन काम पूर्ण करून दिल्याबद्दल स्थानिक रहिवाशांनी खासदार श्रीरंग बारणे यांचे आभार मानले. तसेच परदेशी आळी येथील प्रसिद्ध असलेले प्राचीन भोईर (धुमाळ) अस्थानात जाऊन मनोभावे दर्शन घेतले. यावेळी शहर संघटक अभिजीत साखरे, उपशहरप्रमुख अर्जुन परदेशी, प्रसिद्धी प्रमुख तौफिक बागवान, प्रभाग 14 विभागप्रमुख आशिष पनवेलकर, शाखाप्रमुख अविनाश साफल्य, किरण पवार, प्रतीक वाजेकर, रोहित भोईर, युवासेना प्रभाग 18 विभागप्रमुख चिन्मय सोनावणे, प्रभाग 14                                                 विभागप्रमुख रितेश पनवेलकर, शाखाप्रमुख अनिकेत जैस्वाल, ओमकार पनवेलकर व स्थानिक रहिवासी संजय पाटकर, मयुरेश पाटकर, विजय पाटील, सदानंद सोमण, अनिरुद्ध भातखंडे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण