पांडुरंग गोपाळ काते(खरिवली) यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन

 पांडुरंग गोपाळ काते(खरिवली) यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन 



हनुमंत मोरे ( पाताळगंगा न्यूज )
खोपोली / वावोशी : २६ ऑगस्ट

                   खालापूर तालुक्यातील खरिवली या ग्रामीण भागातील एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेले पांडुरंग काते हे साधे आणि प्रामाणिक जीवन जगले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.अशिक्षित असलेल्या कातेंचा पेहराव पाहिला तर एखाद्या सुशिक्षित व्यक्तिला सुध्दा ते मागे टाकतील,अशी त्यांची नेहमीची राहणी होती.काल दिवसभर आपली कामे करून संध्याकाळी घरी गेले,रात्रीचे जेवण करून आपल्या कुटुंबासह झोपी गेले ते पुन्हा उटलेच नाहीत.ही गोष्ट जेव्हा परिसरात समजली तेंव्हा कोणाचाही या गोष्टी विश्वास बसत नव्हता.अखेर नियतीने आपला डाव साधल्याने लोकांना त्यांचे अंत्यदर्श घेण्याशिवाय काहीच शिल्लक नसल्याचे दिसून आले.
             पांडुरंग काते यांचे अकाली निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.त्यांच्या मागे पत्नी,एक मुलगा (त्याचेही लग्न झाले नाही),दोन अविवाहित मुली,तीन मुलींची लग्न झाल्याने त्यांचा असा मोठा परिवार त्यांच्यावर अवलंबून होता.काते यांनी आपल्या जीवनात कधीच कोणाशी लबाडी, फसवेगिरी केली नाही.साधी राहणी आणि उच्च विचार सारणी या उक्तीप्रमाणे त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जगले.त्यांच्या अंत्ययात्रेला परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण