रा.जि.प.मराठी शाळा तळा येथील वक्तृत्, चित्र कला स्पर्धेत कु.स्वराज नांदगावकर सर्वप्रथम!

 रा.जि.प.मराठी शाळा तळा येथील वक्तृत्, चित्र कला स्पर्धेत कु.स्वराज नांदगावकर सर्वप्रथम! 

  

कृष्णा भोसले ( पाताळगंगा न्यूज )
तळा : २६ ऑगस्ट


              तळा शहरातील रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त घेतलेल्या वक्तृत्व स्पर्धेत व रंगभरण चित्रकला स्पर्धेत पहिलीमध्ये  असलेल्या कु. स्वराज्य प्रशांत नांदगावकर यांनी सर्वप्रथम मिळविला आहे. 
शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत गट क्रं. १ इयत्ता पहिली व दुसरी प्रथम क्रमांक कु. स्वराज नांदगावकर, व्दितीय कु. तुषार धाडवे, तृतीय क्रमांक यशवर्धन पवार, गट क्रमांक १मध्ये इयत्ता पहिली व दुसरी मध्ये प्रथम क्रमांक कु. स्वराज नांदगावकर, व्दितीय पुष्कर सुतार, तृतीय कु. आयुष वाडेकर असे प्रावीण्य विदयार्थ्यांनी कमावले आहे. 
           

   
 दोन्ही स्पर्धेत सुयश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे देखील मनःपूर्वक अभिनंदन शिक्षक पालक यांनी केले आहेत.त्याचबरोबर.सहभाग न घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढील सहभागाकरता व यश संपादन करण्याकरिता खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर सहकार्य केलेल्या पालकांचे तसेच परीक्षक म्हणून परीक्षण केलेल्या साधनव्यकी श्रीम. प्रतिभा ठाकूर मॅडम व श्री . विनोद तुपे सर( शाळा - खांबिवली आदिवासीवाडी) या सर्वांचेच खूप आभार शाळेच्या वतीने केले आहे. 
    
    

Post a Comment

0 Comments

बांधकामंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त चौकमध्ये रक्तदान शिबिर, सरपंच रितू ठोंबरे यांनी केले रक्तदान