वावोशी मंडळ अधिकारी तुषार मिलिंद कामत यांचा,लोकाभिमुख, गतिमान व पारदर्शक कामामुळे गौरव

 वावोशी मंडळ अधिकारी तुषार मिलिंद कामत यांचा,लोकाभिमुख, गतिमान व पारदर्शक कामामुळे गौरव



हनुमंत मोरे
वावोशी / खोपोली ८ ऑगस्ट 

             नुकत्याच झालेल्या इर्शाळवाडी दरडग्रस्त प्रकरणात शासनाच्या वतीने मदतकार्यात अग्रेसर राहत कर्तव्यनिष्ठा राखून उल्लेखनीय कामकाज केल्यामुळे जिल्हाधिकारी रायगड यांच्या वतीने महसूल दिनाचे औचित्य साधून वावोशी मंडळ अधिकारी तुषार मिलिंद कामत यांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
                 तुषार मिलिंद कामत यांनी प्रशासनाची तसेच जनसामांन्यांची जबाबदारी स्विकारुन त्यांनी महसूल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या “महाराजस्व अभियान" यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. तसेच सन २०२२- २३ या महसूल वर्षामध्ये शासनाच्या विविध योजना, उपक्रम व आपत्ती काळात कर्तव्यनिष्ठा राखून उल्लेखनीय कामकाज केले आहे. 
            महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, गतिमान व पारदर्शक होण्यास मोलाचे योगदान दिले आहे.त्यामुळे महसूल दिनाचे औचित्य साधून रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत तुषार मिलिंद कामत यांचा मानपत्राद्वारे गौरविण्यात आले.

Post a Comment

0 Comments

एक्झॉनमोबिल कंपनी कडून विद्यार्थ्यांस शैक्षणिक साहित्य वाटप