आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ,साजगाव विभाग यांचे कडून, खरविली प्राथमिक शाळेत विध्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप
दीपक जगतात
खालापूर : ८ ऑगस्ट,
पनवेल मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस ५ ऑगस्ट रोजी होता परंतु चौक इर्शालगडावरील दुःखद घटनेमुळे रायगड जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्ते यांना आमदार प्रशांत ठाकूर यांनी माझ्या वाढदिवसा निमित्ताने कोणत्याही प्रकारचे बॅनरबाजी व सेलिब्रेशन करू नये असे आवाहन केले होते.यामुळे वाढदिवस साजरा न करता खरविली प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वह्या पुस्तके व खाऊचे वाटप करण्यात आले.
साजगाव विभाग प्रमुख भरत महाडिक यांच्या संकल्पनेतुन व सनी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आज छत्तीसी विभागातील हा उपक्रम हाती घेण्यात आले.विद्यार्थ्यांच्या दिलेल्या ह्या वस्तू मुळे कार्यकर्ते यांना आपण चांगले उपक्रम राबविल्यामुळे विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर समाधानांचे भाव दिसत होते .
ह्यावेळी सनी यादव भाजपा रायगड जिल्हा कोषाध्यक्ष,सुंदर रघुनाथ पवार सरपंच,भरत महाडिक विभाग प्रमुख साजगाव ,शांताराम पाटील, मिलिंद दाभोलकर, पुंडलिक पाटील,अशोक पाटील,रवींद्र मोरे जेष्ठ कार्यकर्ते भाजपा,परशुराम पाटील,संतोष महाडीक, बाळू कासार, शिवाजी पाटील,उत्तम महाडिक मनोहर वाझे,कल्पेश महाडिक,हनुमंत महाडिक,नारायण मोहिते,रामदास पालांडे,सुप्रिया नवले मुख्याधिपिका,संजय रिंगे शिक्षण, रवींद्र घोगरे शिक्षक आदी उपस्थित होते.
0 Comments