झाडांनी ( आपटी ) येथे भात पिक शेती शाळेचे आयोजन
पाताळगंगा न्यूज :वृत्तसेवा
झाडांनी ( आपटी ) १८ सप्टेंबर
तालुक्यात सातत्याने हवामान बदलत असल्यामुळे वातावरणामध्ये उष्ण व दमट हवामान निर्माण होत असल्यामुळे कीड व रोगाचा उपद्रव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यामुळे खालापूर तालुक्यातील झाडांनी ( आपटी ) येथे तालुका कृषी अधिकारी खालापूर यांच्या माध्यमातून क्रॉप शॉप अंतर्गत भात पीक शेती शाळेचे आयोजन करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्र रोहा येथील शास्त्रज्ञ जीवन आरेकर यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना कीड व रोगाबाबत मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी रोग व किडीचा जीवनक्रम ओळख व त्यावर उपाय याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी खोडकिडा नियंत्रणासाठी क्विनॉ लफॉस २५ % इ सी प्रवाही २५ मिली १० लिटर पाण्यातून फवारावे किंवा कारट्याप हायड्रोक्लोराइड ४ टक्के दाणेदार ६ किलो प्रति एकर द्यावे तसेच करपा रोगासाठी कोपर ऑक्झिक्लोराईड २५ ग्रॅम १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. व शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
तालुका कृषी अधिकारी सुनील निंबाळकर यांनी जैविक शेती मिशन अभियान बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी गट स्थापनेचे आवाहन केले. मंडळ कृषी अधिकारी जगदीश देशमुख यांनी कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरण, फळबाग लागवड योजना, स्वर्गीय गोपीनाथजी मुंढे शेतकरी सानुगृह अपघात योजना व इतर योजनांची माहिती उपस्थित शेतकरी बांधवांस दिली व जास्तीत जास्त योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक धुमाळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी सहाय्यक सागर माने व अंकुश शेलार यांनी विशेष प्रयत्न केले.
0 Comments