पायी हळू - हळू चाला मुखाने गजानन बोला; भक्तीमय वातावरणात गौरी - गणपती ला भावपूर्ण निरोप

 पायी हळू - हळू चाला मुखाने गजानन बोला;  भक्तीमय वातावरणात गौरी - गणपती ला भावपूर्ण निरोप




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा                                 माजगांव - आंबिवली : २४  सप्टेंबर, 

                  गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर,पायी हळू - हळू चाला मुखाने गजानन बोला या जय घोषात रसायनी,मोहपाडा,चौक ,खालापूर या ठिकाणचा परिसरात गणरायाच्या आवाजाने भक्तिमय झाले होते.विसर्जनाच्या कोणतेही अनुचित प्रकार घडू नये या साठी अनेक ठिकाणी पोलिस बंदोबस्त होता.सर्वत्र ठिकाणी गणरायाची विसर्जनाची तयारी चालली असल्यामुळे फटक्याच्या आणि टाळ्यांच्या आवाजात गुळाला उधळून मोठ्या आनंदाने गणरायाचे विसर्जन करण्यात आले.                        



      दिड दिवसाच्या बाप्पाला निरोप दिल्यानंतर पाच दिवसाच्या बाप्पाला निरोप देताना पावसाने गणेश भक्तांची धांदल उडून दिली होती.मात्र आज पाच दिवसाच्या विसर्जनास पाऊसाचा जोर कमी असल्याने सार्वजनिक मंडळाने तसेच गावातील घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी लवकरच तयारी केली होती. साथ दिवस आपल्या सानिध्यात राहिलेले गणपती बाप्पा सोडून जाणार म्हणून लहान मुले केविलवाण्या  नजरेनी पाहत असून दु:खी कष्टी झाले होते.    




                                                





   आई,वडील घरातील वडीलधारी माणसे या लहान मुलांची समजूत काढण्यांचा प्रयत्न करीत होते गणपती बाप्पा पुढल्या वर्षी लवकर येणार? यामुळे सर्व वातावरण भक्तीमय झाले होते.बाप्पाला भक्तीभावाने निरोप देत असतांना  लहानापासून थोरापर्यंतचे डोळे पाणावले होते.मात्र गणपतीला निरोप देताना पायी हळु हळू चाला मुखाने गजानन बोला, एक, दोन,तीन, चार गणपती चा जयजकार,गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला,गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या भावपूर्ण गजरात गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments

सामाजिक कार्यकर्ते मारुती ज.ढवाळकर यांचा स्तुत्य उपक्रम