कु. क्षितिजा जगदीश मरागजे ठरली गोल्डन गर्ल.

 कु. क्षितिजा जगदीश मरागजे ठरली गोल्डन गर्ल.




पाताळगंगा न्यूज ( गुरुनाथ साठेलकर )
खोपोली : २४ सप्टेंबर,

            कु. क्षितिजा जगदीश मरागजे हीने महाराष्ट्र राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून रायगड जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. क्षितिजाने वर्ष २०२२  मधे देखील सुवर्ण पदक पटकावले होते.  रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना तिने मुंबई विभागामध्ये सुवर्णपदक प्राप्त करून शालेय स्थरावरील राज्य स्पर्धेमधे तीने सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचा हस्ते झाले.
                  स्वर्गीय भाऊ कुंभार कुस्ती संकुलात कुस्ती विशेषज्ञ संदीप वांजळे, कुस्ती प्रशिक्षक राजाराम कुंभार, कोच बाळा दादा, दीवेश पालांडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडतर सराव करणाऱ्या कु. क्षितिजाने लातूर मधे झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये मानाचे सुवर्णपदक जिंकून खोपोलीचे पर्यायाने रायगडचे नावं सुवर्ण अक्षरानी कोरले आहे. याच स्पर्धेमध्ये प्रणिती शिंदे हीने ब्राँझ पदक मिळविले आहे. 



            महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्ह्य क्रीडा अधिकारी लातूर यांच्या वतीने राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा २०२३-२४ चे भव्य अयोजन २३ ते २४ सप्टेंबर दरम्यान करण्यात आले होते .या राज्यस्तरीय स्पर्धेत १४  वर्ष वयोगटातील महाराष्ट्रातील मुंबई,पुणे,कोल्हापूर,नाशिक,औरंगाबाद,अमरावती,नागपूर,लातूर या आठ विभागतील महिला खेळाडू सहभाग घेतला. पै. क्षितिजा सोबत संपूर्ण मरागजे कुटुंबिय आणि तीच्या सहकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आता प्रतीक्षा राष्ट्रीय गोल्ड मेडलची असे समर्पक प्रतिपादन खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांनी केले








 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर