युवासेना आयोजित खारघरचा युवराज या गणेश उत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पाताळगंगा न्यूज : संजय कदम
पनवेल २७ सप्टेंबर,
युवासेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) आयोजित खारघरचा युवराज या गणेशोत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
खारघर वसाहती मधील सेक्टर १२, युवासेना मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी गणेशाची स्थापना करण्यात आली आहे.
यंदाचे हे या उत्सवाचे ७ वे वर्ष असून या निमित्ताने सत्यनारायणाची महापूजा, महाप्रसाद, विविध धार्मिक कार्यक्रम, मार्गदर्शन शिबीर, भजने, आदींचे आयोजन युवासेना उपजिल्हा अधिकारी रायगड अवचित राऊत व उपशहर संघटक विद्याधर गोगुरवार व खारघरचा युवराज मित्र मंडळ यांनी केले आहे. या गणेशाचे दर्शन विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतले आहे.
0 Comments