अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था श्रमदान मोहीम

 अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था श्रमदान मोहीम,                                               १ ॲक्टो २०२३  रोजी सकाळी १० वाजता




पाताळगंगा न्यूज : ( गुरूनाथ साठेलकर )
खोपोली : २७ सप्टेंबर,

                    अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य नेहमीच कोणत्याही विधायक कार्यात आपले योगदान देत असतात.  यंदा राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि सरकारच्या माध्यमातून स्वच्छतेसाठी "श्रमदान मोहीम" आयोजित केलेली आहे. त्या अनुषंगाने "शंकर मंदिर तलाव" येथे दोन रबरी बोट, सुरक्षेची आणि स्वच्छतेची साधने घेऊन आपले मेंबर्स तलाव आणि परिसराची स्वच्छता करणार आहेत. 
                हा उपक्रम १ ऑक्टोबर २०२३  रोजी सकाळी  १० वाजता खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनुप दूरे आणि खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.या उपक्रमात आपण सर्वांनी सहभागी होऊन स्वच्छतेचा संकल्प करूया असे आवाहन गुरुनाथ रामचंद्र साठेलकर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर