मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी त्वरित बदलून घेतले ड्रेनेज झाकण

 मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी त्वरित बदलून घेतले ड्रेनेज झाकण




पाताळगंगा न्यूज : संजय कदम 
पनवेल : २७ सप्टेंबर,

                    प्रभाग १८  मधील स्वामी नित्यानंद मार्ग वरील ओरिएंटल इन्शुरन्स बँक समोरील रस्त्यावर जड वाहन गेल्यामुळे ड्रेनेज झाकण तुटले होते.परिसरातील जागरूक नागरिकांनी याविषयीची माहिती कार्यक्षम नगरसेवक विक्रांत पाटील यांना दिली.दुर्घटना होण्याची शक्यता लक्षात घेऊन विक्रांत पाटील यांनी त्वरित ड्रेनेज च्या बाजूने तात्पुरती उपाययोजना करून घेतली व लगेचच महापालिका अधिकाऱ्यांशी बोलून ड्रेनेज झाकण बदलून घेण्यास सांगितले.                                                      महापालिकेने त्वरित त्याठिकाणी नवीन मजबूत ड्रेनेज झाकण फ्रेम सहित लावून घेतले.विक्रांत पाटील हे नेहमीच तत्परतेने प्रभागातील समस्या सोडवतात याबद्दल नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर