३ आक्टोबर रोजी धडकणार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

 धनगर आरक्षण मोर्च्यात लाखोंच्या संख्येने सामील व्हा,सकल धनगर समाजाचा ३ आक्टोबर रोजी धडकणार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 




पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे 
खोपोली : २४ सप्टेंबर,


               धनगर समाजाला (एसटीचे  सर्टिफिकेट )धनगर आरक्षण मिळावे यासाठी सकल धनगर समाज रायगड यांच्या वतीने धनगर समाजाच्या मेळाव्याचे  आयोजन करून  जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्च्याचे आयोजन केले आहे, हा मोर्चा ३ आक्टोबर २०२३  रोजी सकाळी १०  वाजता अलिबाग येथे आयोजित केला आहे.
              उठ धनगरा जागा हो ...आरक्षणाचा धागा हो .... हे ब्रिद वाक्य घेऊन धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी  राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने गेल्या १८  दिवसापासून आमरण उपोषण चालू केले आहे, या उपोषणाला रायगड जिल्ह्यातून पाठींबा देऊन सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या  धडक मोर्च्याचे  आयोजन केले आहे.
               राज्यात गेल्या ७० वर्षांपासून धनगर समाजाचा प्रत्येक राजकीय पक्षांनी फक्त मतांपुरता वापर केला असून आरक्षणाची मागणी अद्याप पूर्ण केली नाही, गेल्या अनेक वर्षे या मागणीसाठी धनगर समाजाला संघर्ष करावा लागत असून  आता थेट उठ धनगरा  जागा हो ...आरक्षणाचा धागा हो ....हे ब्रीद वाक्य घेऊन  समाज रस्त्यावर उतरला आहे. 
               या मागणीसाठी यशवंत सेना यांच्या वतीने चौंडी येथे १८  दिवसापासून बेमुदत आमरण  उपोषण चालू आहे मात्र त्यांची तब्बेत खालावली असून  त्यांना पाठींबा देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून मोठं मोठी आंदोलने होत आहे,त्यांनाच पाठींबा देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील धनगर समाजाने  आक्रमक पवित्रा घेतला असून संघटना, संस्था गट तट, बाजूला ठेवून  धडक मोर्च्याचे आयोजन केले आहे  या मोर्चात रायगड जिल्ह्यातून सकल धनगर समजाने  मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सकल धनगर समाज रायगड यांच्या वतीने केले आहे.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर