मी नव्हे तर गावातील प्रत्येक व्यक्ती सरपंच,प्रकाश पाटील यांचे प्रतिपदान

 मी नव्हे तर गावातील प्रत्येक व्यक्ती सरपंच,प्रकाश पाटील यांचे प्रतिपदान 



पाताळगंगा न्यूज : हनुमंत मोरे
खोपोली : ३१ ऑक्टोबर,
   
                  सरपंचपदाच्या निवडणुकीत मी निवडून आलो तरी होनाड ग्रामपंचायतीचा सरपंच मी होणार नसून या गावातील प्रत्येक व्यक्ती सरपंच म्हणून असणार आहे.आजपर्यंतच्या अनुभवाचा उपयोग करीत गावासह ग्रामपंचायत हद्दीतील परिसराचा विकास करीत प्रत्येक तरुणांच्या अपेक्षेप्रमाणे त्याला नोकरी किंवा व्यवसाय मिळवून देणे याला प्राधान्य देत काम करणार असे प्रतिपादन होनाड ग्रामपंचायतिच्या निवडणूकीतील सरपंचापदाचे उमेदवार प्रकाश पाटील यांनी प्रचारावेळी केले.
               खालापूर तालुक्यात बावीस ग्रपंचायतीच्या निवडणूकांचे बिगुल वाजल्यानंतर होनाड ग्रपंचायतीमध्ये सरपंचपदाच्या निवडणूकिमध्ये चुरस वाढली आहे.खालापूर तालुक्यातील जनतेचे याच ग्रामपंचायतीकडे लक्ष लागल्याने ही निवडणूक चुरशीची होणार हे बोलले जात आहे.त्यातच शांत स्वभाव आणि डोक्यावर बर्फ ठेऊन राजकारण करीत समाजकारणाला जास्त महत्व देणारे चिंचवळी गोहे येथील समजसेवक प्रकाश पाटील हे पहिल्यांदाच सरपंचपदाच्या निवडणुकीत उतरले आहेत.गेली विस वर्षे त्यांनी ग्रामपंचायतीचे काम केले आहे त्यामध्ये चिंचवळी गोहे,होनाड, टेंबेवाडी तसेच आदिवासी वाडीत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवत मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत.गावात काँक्रीट रस्ते,अंडरग्राउंड गटार,पथदिवे,नित्यानेमाने पाणी पुरवठा, रुग्णांसाठी अध्यवत रुग्णवाहीका, कचरागाडी,शुद्धपाण्यासाठी जळशुद्धीकरण केंद्र तसेच गावातील मूळ मुद्दा असलेला तरुणांच्या रोजगारीचा त्यात अनेक तरुणांना व्यावसायिक बनवून अन्य तरुणांना ग्रामपंचायत हद्दीतील कारखाण्यांमध्ये कायमस्वरुपी नोकरी मिळवून त्यांच्या आयुष्यात भरभराटी आणली आहे.त्यामुळे पूर्ण गावाने पाटील यांना गावातून पूर्णपणे पाठिंबा देत निवडणूकीच्या रिंगणात उभे केले आहे.
                  याच निवडणूकीचा प्रचारास नुकताच सुरुवात झाली असून पाटील यांना गावासह होनाड आणि टेंबेवाडी या दोन्ही गावातील मतदारांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळत असल्याचे प्रचारावेली आलेल्या मतदारांच्या उपस्थितीतून दिसत आहे.यावेली चिंचवळी गोहे येथून बिनविरोध निवडून आलेल्या गणेश पाटील,आशा पाटील आणि वर्षा पाटील या तीनही उमेदवारांणी पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचारात उडी घेतल्याने या प्रचारादरम्यान मोठी रंगत पाहायला मिळत आहे.यावेळी आपले मत मांडताना पाटील यांनी आपण या निवडणुकीत माझ्या ग्रामस्थ्यांच्या आग्रहास्तव उतरलो असून भविष्यात आपला विजय झाला तर सरपंच मी होणार नसून माझे सर्व मतदार सरपंच असतील.त्यांनी टाकलेला माझ्यावर विश्वास हा मला अधिक शक्ती देणारा आहे.त्यामुळे भविष्यात त्यांच्या प्रत्येक सोयी सुविधाकडे माझे जास्त लक्ष राहणार आहे.पूर्वी केलेल्या विकासाकामाचा आणि सरकारी कामात असलेला अनुभव हा ग्रामपंचायतीच्या विकासासाठी महत्वाचा राहील.आपल्या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात या आधी विकासकामासाठी निधी आणला आहे त्यामुळे भविष्यात सरपंचपद आपल्याकडे आले तर अधिक मोठ्या प्रमाणात निधी आणून गावासह ग्रामपंचायतीचा चेहरा पूर्णपणे बदलवून टाकू आणि माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरू असे विचार मांडले 
               प्र क्रं १ मधून निवडून आलेले बिनविरोध उमेदवार गणेश पाटील यांनी पुढील काळात प्र क्रं एक मध्ये निर्माण होणाऱ्या सर्व समस्या दूर करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू आणि गावाचा विकास करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र येत मेहनत घेऊ असे आश्वासन उपस्थितना देत यावेळी आम्हा तिघांनाही बिनविरोध निवडून दिल्याने सर्व ग्रामस्थाचे  आभार माणले.संध्याकाळी चार वाजता सुरु झालेला प्रचार रात्री दहाच्या दरम्यान संपत आला असता शेकडोच्या संख्येने मतदार या प्रचारात उपस्थित असल्याने प्रकाश पाटील यांचा सरपंचपदाच्या निवडणुकीत निश्चित विजय होईल असे विचार यावेळी परिसरातील जाणकारांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर