खालापुर युवा वकील संघटनेचा खोपोलीतील मराठा समाजाच्या साखळी उपोषणास जाहिर पाठिंबा

 खालापुर युवा वकील संघटनेचा खोपोलीतील मराठा समाजाच्या साखळी उपोषणास जाहिर पाठिंबा



पाताळगंगा न्यूज : समाधान दिसले
खालापूर : १ नोव्हेंबर,

                     मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. याच्या समर्थनार्थ राज्यभर मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण आंदोलन सुरू असताना सोमवार दि.३०  आँक्टोंबर पासून सकल मराठा समाज बांधवांनी खोपोलीत साखळी उपोषण सुरू केले असून या साखळी उपोषण स्थळी सर्व सकल मराठा समाज बांधवांनी हजेरी लावत एक मराठा - लाख मराठा व मनोज जरांगे पाटील साहेब तुम आगे बडो, हम तुम्हारे साथ है, या जयघोषाचां गजर केला. तर खालापुर युवा वकील संघटनेने या साखळी उपोषणास जाहिर पाठिंबा दिल्याचे अध्यक्ष ॲड.सचिन चाळके जाहीर करत पाठिंब्याचे पत्र उपोषणकर्ते डॉ.सुनील पाटील व इतर समाज बांधवांनकडे सुपूर्त केले.
              सदर उपोषणस्थली वकील संघटना अध्यक्ष ॲड.सचिन चाळके, ॲड.जयेश तावडे, ॲड.रमेश पाटील, ॲड.मनोज पाटील, ॲड.तुषार बोंबे, ॲड.रितेश पाटील, ॲड.सत्यवान वाडेकर, ॲड.रणावत, ॲड.राजेंद्र भोईर, ॲड.सरगे, ॲड.ऋषिकेश खोपडे, ज्येष्ठ वकील ॲड.रामदास पाटील उपस्थित होते.
              खालापुर युवा वकील संघटना अध्यक्ष ॲड.सचिन चाळके यांनी आपले विचार मांडताना म्हणाले की, वकील संघटना मराठा समाजाच्या पाठीशी असून संघटनेतील वकील मंडळी सर्वतोपरी सहकार्य करतील. तसेच उपोषणकर्त्यांवर पोलिसांमार्फत गुन्हे दाखल झाल्यास युवा वकील संघटनेचे सर्व सदस्य कोणतीही फी न घेता काम करतील असे विचार ॲड.सचिन चाळके यांनी मांडले. तर यावेळी ॲड.जयेश तावडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज की - जय व छत्रपती संभाजी महाराज की - जय या जयघोषनेचा गजर करित मराठा समाज बांधव एकजुटीचा विजय असो अशी घोषणा दिली.
                सकल मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी खालापूर तालुक्यासह खोपोली शहरातील सकल मराठा समाज बांधवांनी सोमवार दि.३०  आँक्टोंबर पासून खोपोलीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर साखळी उपोषण सुरू केले असून या साखळी उपोषणाला परिसरातील अनेक गावातील तरुण व ज्येष्ठ नागरिकांनी पाठिंबा दिला असता साखळी उपोषणास खालापुर युवा वकील संघटनेने जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर