वावर्ले ग्राम पंचायत मध्ये ग्रामविकास आघाडीचे थेट सरपंच पदाच्या उमेदवार अनिता पांडुरंग लबडे यांची प्रचारात आघाडी...

 वावर्ले ग्राम पंचायत मध्ये ग्रामविकास आघाडीचे थेट सरपंच पदाच्या उमेदवार अनिता पांडुरंग लबडे यांची प्रचारात आघाडी...




पंकज लभडे युवा कार्यकर्ता 


पाताळगंगा न्यूज : दीपक जगताप 
खालापूर  : १ नोव्हेंबर,

              ५ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये वावर्ले  ग्राम पंचायत मध्ये ग्रामविकास आघाडीचे उमेदवार यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचारात आघाडी पहायला मिळत आहे. ह्या वेळी आम्हाला एक संधी द्या आम्ही राहिलेली अनेक विकासकाने मार्गी लावू अशी आश्वासन महावीकास आघाडीकडून देण्यात येत आहेत. त्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व आदिवासी बांधवांची आज पर्यंत न झालेली कामे आहेत ती आम्ही लवकर मार्गी लावू असेही बोलले जात आहेत .वावर्ले ग्रामपंचायत मध्ये आमदार महेश बाळदी यांच्या निधीतून अनेक विकास कामे मार्गी लागली असून काही कामे प्रगती पथावर असून ह्याचा फायदा ही ग्रामविकास आघाडीला होऊ शकतो. 
              थेट सरपंच पदाचे उमेदवार अनिता पांडुरंग लबडे यांच्यासह सदस्य पदासाठी निवडणूक लढवत असलेले गजानन मुकणे,अजय (बाळा)पारठे,मेघा रमेश भद्रीके ,मंदार शांताराम उतेकर ,सुरेखा सिद्धार्थ रणदिवे यांचा विजय निश्चित होणार असे बोलले जात आहे.भाजपा जेष्ठ कार्यकर्ते अरुण पारठे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास आघाडी निवडणूक लढवत असून दामू खैर ,पंकज लबडे,प्रदोष भद्रीके, दिलीप मांडे,शहाजी पाटील,श्रीराम पारठे,राजेश पारठे,मनोज पारठे,सचिन ठोंबरे आदी सहकारी कार्यकर्ते निवडणूकी मध्ये मेहनत घेत आहेत.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण