ग्रूप ग्राम पंचायत माजगांव च्या निवडणूकीत तिसऱ्या दिवशी ही प्रचारांचा झंझावात

 ग्रूप ग्राम पंचायत माजगांव च्या निवडणूकीत तिसऱ्या दिवशी ही प्रचारांचा झंझावात,पौध,अदिवासी वाडी येथे यात्रा की प्रचार रॅली,विरोधक सभ्रमांत 




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
माजगांव /आंबिवली ३१ ऑक्टोबर,

               ग्रूप ग्राम पंचायत माजगांव च्या निवडणूकीच्या चर्चेला उधाण आले असून,आज पौध आणी दोन अदिवासी वाडीत  प्रचार रॅलीचा तिसऱ्या दिवशी ही प्रचारांचा झंजावात पहावयांस मिळाला.या निवडणूकीत महाविकास आघाडीचे थेट सरपंच सह सर्व उमेद्वार बहु संख्येने निवडून येणार आसा कौल परवा  झालेल्या आंबिवली येथिल प्रचार ऱॅलीत मतदार राज्यांनी दिला. न भुतो भविष्यते अशी प्रचारांची रॅली गावामधून जात असतांना ही ऱॅली म्हणजे भविष्यांचा वेध घेणारी ठरली आहे.    


  
                    तीन्ही प्रभागा मध्ये  महाविकास 
  आघाडी बाजी मारणार हीच चर्चा ऐकण्यांस मिळत होते.प्रचार रॅली काढण्यांचे एकच उदिष्टे की आपण निवडणूकीत जनसेवा करण्यांची संधी आपणांस मिळावे यासाठी आपले बहुमूल्य मत आमच्या पारड्यात दिल्यांने विकासांची गंगा निर्माण करण्यांची ताकद आम्हाला प्राप्त होइल, या विचारांतून मतदार राज्यांचा सकारात्मक भावना जागृत व्हावी आणी आम्ही ग्रूप ग्राम पंचायत निवडणूकीच्या रिंगणात उभे आहोत यांची कल्पना उमेद्वार यांना मिळाली.या उद्दात विचारांतून ही रॅली काढण्यात येत आहे.     


        
                आता मतदार राज्यांस कळले आहे.विकास कोण करु शकतो,विरोधकांनी कितीही आवाज उठविला तर मतदार राजा त्यांच्या भावनिक भाष्याला भुलणार नाही. अशी चर्चा या प्रचाररॅलीत ऐकण्यांस मिळत होत. कारण ज्यांच्या नावामध्येच महाविकास आघाडी आहे.ते या गावांचा विकास करु शकतात. या निवडणूकीत राजकीय अनुभव असलेले व्यक्तीमत्व या निवडणूकीच्या रिंगणात उभे असल्यामुळे दिवसेंदिवस उमेद्वार यांचे पारडे जड होत चालले आहे.


              त्यातच महाविकास आघाडीच्या माध्यमातून दोन उमेद्वार हे बिनविरोध दिल्यामुळे साहजिकच या निवडणुकीत घवघवीत यश संपादन करु शकते,असा विश्वात निवडणूकीच्या रिंगणात उभे असलेले थेट सरपंच पदासाठी  दिपाली नरेश पाटील,क्रमांक १ मधून वर्षा रमेश जाधव यांस छताचा पंखा,तसेच प्रांजळ प्रदिप जाधव - यांस कंगवा,तसेच मधुकर गायकवाड कपाट त्याच बरोबर त्याच बरोबर अर्पणा यशवंत शिंदे प्रभाग क्रमांक ३ मधुन छताचा पंखा म्हणून चिन्ह मिळाले आह. राजेश शिवराम पाटील प्रभाग क्रमांक ३ मधून छताचा पंखा चिन्ह मिळाले आहे. वैशाली नितिन महाब्दि - शिटी ,वंदना सुधाकर महाब्दि - टोपली,प्रभाग क्रमांक २ मधून शशिकांत गजानन पाटील,तसेच सरिता कमलाकर वाघे यांची प्रभाग क्रमांक २ मधून बिनविरोध निवड करण्यात आली होती.
             


     पाच वर्षातून एकदाच निवडणूका येत असल्यामुळे प्रत्येक आपल्या पक्षाचा उमेद्वार निवडणून येण्यासाठी धडपड करीत असतो.मात्र जि व्यक्ती आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर विकास कामे करुन गावांचा विकास करणार त्यांस निवडून देण्यांचा विचार मतदार राजा करीत आहे.यामुळे निवडणूकीमध्ये महाविकास आघाडी मुसंडी मारणार असे चित्र सध्या निर्माण झाले आहे.मतदार राज्यांना वाढलेले प्रेम हेच विजयांचे दिशा दर्शवित आहे.यामुळे या निवडणूकीत उभे असलेले सर्वच उमेद्वार यांच्या चेहऱ्यावर विजयांचे चिन्ह दिसत आहे ते फक्त मतदार राजाच्या प्रेमामुळे....

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर