विद्यार्थ्यांनी शाळेला मारली दांडी, राजिप शाळा वडगाव विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अनोखे आंदोलन

 विद्यार्थ्यांनी शाळेला मारली दांडी, राजिप शाळा  वडगाव विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अनोखे आंदोलन




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
वडगांव : १९ ऑक्टोबर,

                मज आवडते मनापासून शाळा,लाविते लळा जशी माऊली बाळा आज ख-या अर्थाने मराठी शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांसाठी केलेले काम कौतुकास्पद मानले जात आहे.सध्या नवरात्र उत्सव सुरु असतांना विद्यार्थी शाळेला दांडी मारीत आहे. चौथी मध्ये शिक्षण घेत असलेला धनराज कोंडीलकर हा नवरात्र असल्यामुळे शाळेत येत नसल्यामुळे मुख्याध्यापक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलांच्या घरी सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरी जावून अभ्यास करुन  अनोखे आंदोलन मात्र आपली चूक झाली आहे हे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास येताच वेळेवर शाळेत जावू असे आश्वासन या मुलांनी शिक्षक आणी विद्यार्थ्यांना दिले.
             खाजगी शाळेमध्ये एखादा विद्यार्थी शाळेत गेला नाही तर तेथिल शिक्षक त्यांच्या पालकांना फोन करून विचारता. मात्र मराठी शाळेतील शिक्षक मुलांच्या घरी जावून वस्तू स्थिती जाणून घेतात.आणी त्या मुलांना शाळेमध्ये येण्यास अग्रह करतात.हे फक्त मराठी शाळेत घडू शकते.मुलांच्या मध्ये बदल घडविण्यांची ताकद शिक्षकांमध्ये असून त्या मुलामध्ये सकारात्मक उर्जा प्रदान करतात.
           आज आपण विविध माध्यमातून आंदोलन पाहतो मात्र एखादा विद्यार्थी शाळेत येत नाही यासाठी केलेले आंदोलन मोठा चर्चेचा विषय ठरला आहे.शिवाय येथिल शिक्षकांचे कौतुक सुद्धा केले जात आहे.मुलगा शाळेत जावून शिक्षण घ्यावे तो मोठा व्हावे यासाठी त्या शिक्षकांनी घेतलेल्या निर्णयांचे ग्रामस्थांकडून कौतुक केले.मात्र आपण नियोजित वेळेवर शाळेत जाणार म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन स्थगित केले.

 

Post a Comment

0 Comments

एक्झॉमोबिल कंपनी कडून विद्यार्थ्यांस शैक्षणिक साहित्य वाटप