आतरगाव ग्राम पंचायत ग्रामविकास आघाडीच्या उमेदवारांचे शक्ती प्रदर्शन उमेद्वार अर्ज दाखल

 आतरगाव ग्राम पंचायत ग्रामविकास  आघाडीच्या उमेदवारांचे शक्ती प्रदर्शन उमेद्वार अर्ज  दाखल




पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे 
खालापूर : १९ ऑक्टोबर, 


          आतकरगाव ग्रामपंचायतच्या वार्ड क्रमांक १  च्या उमेदवारांचे आज मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
            वार्ड क्रमांक १ च्या ग्रामविकास आघाडीच्या पॅनलचे उमेदवार मेघना अविनाश देशमुख , करुणा शैलेश तुपे, आणि विजय गोपाळ वाघमारे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले, 
               खालापूर तालुक्यातील अतिशय प्रतिष्टेची असलेल्या आतकरगाव ग्रामपंचायतची निवडणूक येत्या ५ नोव्हेंबरला होणार  असून यासाठी सर्वच पक्षांनी आपली ताकद दाखवत  उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, 
            यातील  वार्ड क्रमांक १ मधील हे तिन्ही उमेदवार तरुण सुसूक्षित असून त्यांना मतदारांचा वाढता पाठींबा आहे, त्यांनी आज मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करून  खालापूर तहसील येथे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले यावेळी आडोशी ,बौद्धवाडा, आदिवासीवाडी, वाघरनवाडी, गवळी वाडा येथील ग्रामस्थ आणि मतदार  मोठया संख्येने उपस्थित होते, 

Post a Comment

0 Comments

सुकीवली जिल्हा परिषद गटातून प्रशांत आखाडे