पश्चिम विभागीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत कुणाल पिंगळे ने पटकावले सुवर्णपदक
पाताळगंगा न्यूज : नवज्योत पिंगळे
खालापूर : ३ ऑक्टोबर,
              फोंडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्पोर्टस अथोरिटी ऑफ इंडिया नॉर्थ गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा येथे आयोजित राष्ट्रीय सब ज्युनिअर सीनियर (पुरुष व महिला) पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र संघातून रायगड च्या दोन स्पर्धकांनी सुवर्णपदके पटकावली.असुन घोडीवली मधील कुणाल सुभाष पिंगळे  यांने राष्ट्रीय स्पर्धेत सलग चौथ्यांदा सुवर्ण पदक जिंकले असून नवा विक्रम केला आहे. 
               ही स्पर्धा २७ ते २९ सप्टेंबर या दरम्यान झाली. स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातून रायगड जिल्ह्याचे ज्युनिअर पुरुष ५३ किलो वजनी गटात कुणाल पिंगळे यांने  ४१५किलो वजन घेतले. त्या मध्ये स्कॉट प्रकारात १४५ किलो बेंच प्रेसमध्ये ९५ किलो व डेडली प्रकारात १७५ किलो वजन घेऊन कुणाल ने सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.
                 व्यायाम शाळेकडे तरुणाईचा कल मोठ्या प्रमाणात जात असल्याने शहरी भागासह ग्रामीण भागातील तरुणाईला व्यायाम शाळेकडे आकर्षित करण्याच्या संकल्पनेतून सर्वच स्तरावर व्यायामा निगडीत स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असताना याच अनुषंगाने फोंडा स्पोर्ट कॉम्प्लेक्स स्पोर्टसऑफ इंडिया नॉर्थ गोवा ऑथॉरिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय बेंच प्रेस स्पर्धा पार पडली असून या स्पर्धेत देशभरातील असंख्य मातब्बर खेळाडूंनी सहभाग दर्शवत आपले कौशल्य सादर केले.
               या स्पर्धेत रायगड जिल्ह्यामधील खालापूर तालुक्यातील घोडीवली गावा मधील या स्पर्धेत ज्युनिअर गटात कुणाल पिंगळे  सुवर्णपदकाची कमाई करित नैपुण्य मिळवल्याने सर्वच ठिकाणावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 
 
 
 
 
 
.jpg) 
.jpg) 
 
 
 
 
 
 
0 Comments