शिक्षणावर बोलू काही....

 शिक्षणावर बोलू काही...२ सुभाष राठोड 

पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
वडगांव : २ ऑक्टोबर,


             
                  विषय असा आहे की प्रत्येक पालक,शिक्षक, अधिकारी,प्रशासन या सर्वांना वाटते की  शंभर टक्के मुलांनी थ्री एडियट च्या  रँचो सारख व्हावं पण कोणाला हे नाही वाटत,की आपल्याही मुलाला चांगली उवक्रमशील शाळा असावी,नित्य नवनवीन प्रयोग करणारे शिक्षक असावेत.आम्ही पेरतो बाजरी,आणि रास भुईमुगाची करू पाहतो...
               परवा ग्रामपंचायत कार्यालयात सभेसाठी उपस्थित होतो.लॉयन्स क्लब च्या एक कार्यकर्त्या सहशालेय उपक्रम व इतर बाबींबर मार्गदर्शन करीत होत्या.आमचे क्लब मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी भरपूर काही करत असते,मग मुद्दा आलाच परत मुलांची गुणवत्ता.मी शांतपणे त्यांना ऐकत होतो,पण माझ्या वाकडया मेंदूला त्यांचे बोलणे आवडत असूनही स्वीकारत येत नव्हते.त्या म्हणाल्या की आम्ही सॉफ्टवेअर देऊ आणि विज्ञान विषयांचे विविध प्रयोग प्रत्यक्ष करण्यासाठी व अनुभव घेण्यासाठी देऊ.मुद्दा असा आहे.की आमच्या इथल्या वा परिसरातल्या जवळपास सगळ्या शाळा डिजिटल आहेत,करातून सवलत आणि सामाजिक उतरदायित्वचे  कार्य केल्याचे समाधान म्हणून एक tv किंवा प्रोजेक्टर व सोबत एम पेनड्राइव्ह वा डोंगल आहेत.
                यातले बरेच सुरू आहेत तर काही अजून अपडेट नाहीत.यासोबत जे ई साहित्य आहे त्याचा मी तीन कंपन्यांचा पहिला तर इतका सुमार दर्जाचा आहे की बस्सस ना रंग संगती जुळते ना लय ताल सूर...एकूणच जरा सावळा आहे म्हणूया.कविता म्हंटल की चाल आली ,ताल आला,लय आली पण एकांत तर कविता अगदी गद्य पाठसारखी वाचून सपाट शिकविलेली आहे.मुलं पण तशीच म्हणत होती.असो महत्वाचा मुद्दा हा आहे की आमच्या NGO, CSR, सामाजिक कार्यकर्ते,पुढारी यांना वाटते की प्रत्येक मुलाने गुणवत्तापूर्ण  व दर्जेदार शिक्षण घ्यावे अगदी पालकांना सुद्धा वाटते (शिक्षा,ओरड,थोडासा धाक हे नको डायरेक्ट गुणवत्ता).ही भावना नक्कीच चांगली आहे यास्तव ते वाटेल ते करायला तयार आहेत.पालक तर अगदी 27 ते 30 हजार रुपये वाहतुकीवर खर्च करतायत शिवाय शाळांच्या फी वेगळ्या.म्हणजे हे सर्व मुलांच्या शिकण्यासाठी.या भावनांचा नक्कीच आदर आहे.दुसरी बाजू आहे ती प्रशासन इथे काय गम्मत होते की अधिकारी त्यांच्या समजेनुसार मुलांकडे पाहतात,
           पण यावेळी ते हे विसरतात की प्रत्येक मुल वेगळं आहे.ज्या प्रकारे पाण्यात पोहणारा मासा,जंगलात चालणारा हत्ती,झाडावर उद्या मारणारा माकड,बिळात राहणारा उंदीर या सर्वांना एकाच परीक्षा देऊन झाडावर चढायला सांगणे असे आहे.सर्वच झाडावर चडतील का हो?नाही ना अगदी तसेच मुलांचे आहे त्यांची उपजत नैसर्गिक बुद्धी आहे ती विकसित होईल पण आपण जर आपल्या अपेक्षांचे ओझे त्यांच्यावर लादू लागलो तर ते आहेत तिथूनही मागे जातील.प्रत्येक पालक,अधिकारी व प्रशासनाला वाटते की मुलांनी 3इडियत च्या रँचो सारखे शिकावे पण कोणालाही हे नाही वाटत की त्यांची शाळा पण रँचो सारखी ओपन असावी ज्यात त्या मुलांना खेळता आले पाहिजे, लिहिता वाचता सोबतच बोलता आले पाहिजे याचे त्याला स्वातंत्र्य पाहिजे.पण असे होताना दिसत नाही एखाद्या शिक्षकाने काही चांगला उपक्रम हाती घेतला की प्रशासनाकडून सर्वात आधी नकारात्मक विचार,उणिवा यांचीच उजळणी होते.मग शिक्षक नाउमेद होऊन शांत  बसतो.यामुळे काय होते नुसता शिक्षक नाही तर त्याच्याकडे शिकणारे शेकडो विद्यार्थ्यांच्या क्रियशीलतेला खीळ बसते.
               उलट त्या शिक्षकांचे कौतुक नाही करता आले तरी चालेल पण  नाउमेद न करता त्याला त्या उणिवांवर कशी मात करायची याबद्दल मार्गदर्शन करून उत्साहित केले पाहिजे.प्रत्येक शाळेत शालेय छोटे प्रयोग शाळेचे प्रयोजन पाहिजे.शाळेच्या भिंतीतच शिक्षण होते असे नाही,तर त्याच्या घरापासून सुरू झालेला दिनक्रम म्हणजे शिकणे होय.
मला हे सांगायचे आहे की जर आम्हाला प्रत्येक मूल हुशार आणि रँचो हवा असेल तर,शिक्षकही रँचो सारखे करूया आणि शाळा पण बोलकी व धावणारी गतिमान करूया तरच आपल्याकडे चांगले खेळाडू,वैज्ञानिक,संशोधक तयार होतील.मुलांना मातीचा छंद हवा,मातीचा गंध हवा ,तरच गुणवत्ता वाढेल रे भावा प्रशासन अपेक्षा बोलक्या मुलांची करते आणि प्रश्न पुस्तकातील विचारते.त्यांना हे कळत नाही की पुस्तक एक साधन आहे.अलीकडे एक अधिकारी असे भेटले की त्यांना मुलांचे स्वाध्याय,पुस्तकातील धडे पूर्ण पाहिजेत.हो असे तर असालाच हवे पण मुलं त्यासोबत इतर ही माध्यमातून शिकत असतात तेही पाहावे.
          आपण पुस्तकातीलच कविता पाठ करून घेऊ लागलो तर त्यासोबतच इतर अवांतर जर त्याने केलं असेल तर तेही ऐकून घ्यावे...यामुळे होईल असे की मुलांना अजून नवनवीन ज्ञान मिळविण्याची संधी व प्रोत्साहन मिळेल.एक उदाहरण देतो आणि थांबतो.
  मुलांना पाळीव प्राणी म्हंटल की शहरी मुले डॉग, कॅट म्हणतील,ग्रामीण मुले कुत्रा,गाय,बैल,म्हैस म्हणतील कारण आपण ठेवढंच स्वीकारतो बाकीचे दुर्लक्षित करतो कारण आपल्या इंग्रजी पुस्तकात cat, dog एवढंच आहे.मराठीच्या पुस्तकात गाय , बैल,म्हैस एवढेच आहे.आपले समाधान सुद्धा त्यातच आहे.गणितात सुद्धा तसेच शाब्दिक उदाहरणात जि नावे वापरली तीच नावे आपण रटवतो त्यात चुकून जर दुसरे नाव आले तर आपले हिमालय हलायला लागते कारण मुलाने अक्षम्य गुन्हा केला आहे.गणिताचे सुत्रच बदलून टाकले की काय अशा भीतीच्या सावटाखाली आपणही येतो आणि मुलेही मग काय उपयोग या शिकण्याचा जर तो मुलगा स्वतःच्या अनुभवविश्वाला शिकण्यासोबत जोडत असेल तर आपण त्याला का अडवाव...विचार करा नक्की पटलं तर ठीक नाही पटल तरी प्रतिक्रिया कळवा.या अशा निरस व दर्जाहीन धोरण व निर्णय यामुळे सरकारी शाळा बंद होणार नाहीत तर  काय होईल...
    
     सुभाष राठोड  मुख्याध्यापक, रा.जि.प.शाळा,वडगाव
      9011858485
   

Post a Comment

0 Comments

खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन