जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

धनगर आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करा- सकल धनगर समाज रायगड यांची मागणी,लाखोंच्या संख्येने मोर्च्या काढून जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन,






पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे  
खोपोली : ३ ऑक्टोबर,

                सकल धनगर समाज रायगड यांच्या वतीने आज धनगर आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी  धनगर समाजाचा भव्य मोर्चा  जिल्हाधिकारी  कार्यालयावर  काढून  जिल्हाधिकारी  यांना निवेदन देण्यात आले.
            हा मोर्चा जिल्हापरिषद कार्यालय येथून  ढोल ताश्याच्या गजरात, गजी नृत्य करत, घोषणा देत   लाखोंच्या संख्येने  जिल्हाधिकारी कार्यालयावर लाखो समाज बांधवाच्या वतीने  काढण्यात आला.यावेळी  सरकारने  यशवंत सेनेला दिलेल्या पत्रानुसार जर ५० दिवसांत धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करून समाजाला (एसटीचे सर्टीफिकेट) दिले नाही तर  ५१ व्या दिवसांनंतर  हाच महाराष्ट्रातील धनगर समाज   रस्त्यावर उतरुन तीव्र स्वरूपाचे  आंदोलन करील असा इशारा यावेळी सरकारला  देण्यात आला. 
                आदिवासींच्या  नेत्यांनो धनगर समाजाच्या नादी लागू नका महाराष्ट्रातील  आदिवासी समाज प्रमानेच धनगर समाजही  डोंगर दर्यात कड्या कपारीत राहत असून आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत मात्र आता आदीवासीच्या काही नेत्यांनी धनगर आरक्षणाला विरोध केला आहे ,मात्र आम्ही  नवीन आरक्षण मागत नसून घटनेनी दिलेल्या आरक्षनाची अंमलबजावणी करण्यात करावी ही मागणी आमची ७५  वर्षांपासूनची आहे. तिला आदीवासीच्या नेत्यांची विरोध करू नये  अन्यथा त्यांना महाराष्ट्रातील  धनगर समाज त्यांना जशास तसे उत्तर देईल असा इशारा यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोलताडे यांनी दिला आहे,यावेळी रायगड जिल्ह्यातून  सकल धनगर  समाजाच्या माध्यमातून समाज  बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments

खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन