आमदार गोपीचंद पडळकरांची जागर यात्रा

 आमदार गोपीचंद पडळकरांची जागर यात्रा कोकणात १७  आक्टोबर रोजी धनगर जागर यात्रेनिमित्त साधणार संवाद,धनगर आरक्षणाचा लढा तीव्र करण्याच्या तयारीत.....




पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे 
खोपोली : १२ ऑक्टोबर ,

                     बहुजन  समाजाचे डॅशिंग नेते  आमदार गोपीचंद पडळकर यांचा धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी धनगर जागर यात्रेच्या माध्यमातून धनगर आरक्षण लढा पुन्हा एकदा आमदार गोपीचंद पडळकर उभा करण्याच्या तयारीत असून  आहेत 
             १७ आक्टोबर रोजी कोकणातील खेड आणि रायगड जिल्ह्यातील रोहा याठिकाणी धनगर जागर यात्रेचे आयोजन करून  बैठकीच्या माध्यमातुन संवाद साधणार आहेत, धनगर समाजाने पुन्हा एकदा धनगर समाजाला (एसटीचे सर्टिफिकेट)  धनगर आरक्षण अंमलबजावणी करावी यासाठी  रस्त्यावर उतरुन मोठ्या प्रमाणात आंदोलन मोर्चे काढून सरकारचे लक्ष वेधले आहे, त्याच पार्श्वभूमीवर धनगर समाजाचा ढाण्या वाघ आणि भाजपचे फायरब्रॅण्ड नेते  गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक पवित्रा घेत  आधी समाज  नंतर पक्ष अशी   आमदार गोपीचंद पडळकरानी  जाहीर करून  सरकारला घरचा आहेर दिला आहे,                         आमदार पडळकर हे पुन्हा एकदा लढा तीव्र करण्याच्या तयारीत आहेत आमदार पडळकरांचा धनगर जागर यात्रा १२  आक्टोबर ते १७   आक्टोबर असा पहिला टप्पा असून यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र,विदर्भ आणि कोकण असा  असून १७  आक्टोबर रोजी ते  कोकणात बैठका घेऊन  संवाद साधणार आहेत, कोकणातील  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरस येथे सकाळी ११वाजता ,खेड येथील गणेश मंगल कार्यालय भरणे नाका ता खेड जी रत्नागिरी येथे दुपारी २ वाजता तर रायगड जिल्ह्यातील रोहा येथील आरआयआरसी हॉल घाटाव एमआयडीसी एक्झेल स्टॉप रोहा जी  रायगड येथे  सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे  हा दौरा आमदार पडळकर हे  हेलिकॉप्टरने करणार आहे  
             आधी समाज आणि नंतर पक्ष अशी भूमिका गेल्या महिन्यात आमदार गोपीचंद पडळकरानी जाहीर करून धनगर आरक्षणप्रश्नी राज्यभर संघर्ष जनजागृती,बैठकांचे रणशिंग फुंकले असून आरक्षणाचा लढा तीव्र करण्याच्या तयारीत आमदार पडळकर आहेत, तरी या धनगर जागर यात्रेला कोकणातून मोठ्या संख्येने समाज बांधवानी सहभागी व्हावे असे आवाहन कोकणचे नेते मंगेश गोरे यांनी तर रायगड जिल्ह्यातील युवा  नेतृत्व नरेश कोकरे यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन