कळंबोली वसाहतीमध्ये अनोखे आंदोलन

 खड्ड्यांना हार घालून मा.नगरसेवक रवींद्र भगत यांनी केले कळंबोली वसाहतीमध्ये अनोखे आंदोलन



पाताळगंगा न्यूज : संजय कदम 
पनवेल : ११ ऑक्टोबर,

                कळंबोली वसाहतीमधील विविध भागात रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात तेथील स्थानिक मा.नगरसेवक रवींद्र भगत व त्यांच्या सहकार्‍यांनी मिळून रस्त्यांना हार घालून अनोखेे आंदोलन करून पनवेल महानगरपालिकेचा निषेध केला.
             कळंबोली वसाहतीमधील अनेक रस्त्यांना ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत स्थानिक मा.नगरसेेवक रवींद्र भगत यांनी पनवेल महानगरपालिकेला वेळोवेळी स्मरण पत्र देवून खड्डे बुजविण्यासंदर्भात मागणी केली होती. परंतु या मागणीला महानगरपालिकेने अजूनही दुर्लक्षितच ठेवले आहे, असा आरोप रवींद्र भगत यांनी केला आहे. नुकतीच कळंबोली वसाहतीसाठी महापालिकेने ३००  कोटींच्या कामांना मंजूरी दिली आहे. 
          याचे श्रेय भाजपा घेत असेल तर रस्त्यावरील खड्ड्यांचे श्रेय देखील भाजपनेच घ्यावे असे सुद्धा रवींद्र भगत यांचे म्हणणे आहे. यावेळी त्यांच्या समवेत मा.नगरसेवक गोपाळ भगत व इतर पदाधिकारी, महिला आघाडी यावेेळी उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन