ठोंबरे वाडीत घरफोडी रोख रकमेसह कागदपत्रे लंपास

 ठोंबरे वाडीत घरफोडी रोख रकमेसह कागदपत्रे लंपास



पाताळगंगा न्यूज : संजय कदम 
पनवेल : ३ ऑक्टोबर,

           पनवेल तालुक्यातील ठोंबरे वाडीत एका राहत्या घरामध्ये एका अज्ञात चोरट्याने घडफोडी करून रोख रकमेसह कागदपत्रे लंपास केल्याची घटना घडली आहे.
           यावेळी अज्ञात चोरट्यांनी घराच्या पाठीमागील खिडकीची लोखंडी ग्रील कापून प्रवेश केला. चोरी करण्याआधी चोरट्यांनी बॅटरीच्या सहाय्याने आतील रूमची पाहणी करून सीसीटीव्ही कॅमेरा कपड्याने पद्धतशीर झाकून घेतला. त्यानंतर घरात प्रवेश करून रूम मधील कपाटाची झाडाझडती घेतली, यावेळी एका पॉकेटात दोन ते तीन हजार रुपये दोन एटीएम कार्ड कंपनीचे ओळखपत्र चार चाकीचा परवाना गाडीचे आरसी बुक घेऊन चोरटे पसार झाले आहेत.या चोरीच्या घटनेची पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments

खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन