स्वाभिमानी युथ रिपब्लिकन कार्यकर्ते जोमाने काम करणार- जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे

 रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने काम करणार- जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे



पाताळगंगा न्यूज : संजय कदम 
पनवेल : ३ ऑक्टोबर,

            स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी दोनच दिवसापूर्वी रायगड व रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा संपन्न केला.  या दौऱ्यात त्यांनी महाड, मंडणगड व खेड या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या व आगामी लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद नगर परिषद यांच्या निवडणुकांविषयी चर्चा केली व येणाऱ्या आगामी निवडणुकांसाठी तयारी करण्याचे सुतोवाच जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी केले. 
            या दौऱ्यामध्ये त्यांनी पक्ष संघटना वाढीबाबत कार्यकर्त्यांना सूचना व मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे पनवेल येथे मोठ्या प्रमाणावर गौरा गणपती उत्सव संपन्न होत आहे.  पनवेलमधील सर्व सार्वजनिक गौरा गणपती गणेश मंडळांना त्यांनी सदिच्छा भेट दिली. व  दशर्न घेतले. 

Post a Comment

0 Comments

खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन