रोटरी क्लब ऑफ पेण च्या वतीने गरजू महिलांना कोजागिरी निमित्ताने शिलाई मशीन वाटप
पाताळगंगा न्यूज : दीपक जगताप
खालापूर : ३० ऑक्टोबर,
रोटरी क्लब ऑफ पेण यांनी काल कोजागिरी साजरा या सणांचे औचित्य साधून गरिब,गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आली. जेणेकरून त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली व्हावी व त्यांना एक रोजगार मिळावा हे उदिष्टे डोळ्यासमोर ठेवून,हा शिलाई मशीन वाटपचा उपक्रम हाती घेण्यात आला.
अश्या प्रकारचे अनेक स्तुत्य उपक्रम रोटरी क्लब ऑफ पेण करत असून त्यांना ह्यातून खूप समाधान मिळत असल्यांचे येथिल व्यवस्थापक यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.ह्या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब अध्यक्षा मधुबाला निकम ,जयेश शहा,विजय शहा ,हरेश बेकावडे,सचिन शिगवण,अशोक जैन ,दिलीप जैन ,डॉ जगदीश केसकर, रोहन मनोरे,संयोगीता टेमघरे, मनोज जैन,मितेश शहा,जयंत आपटे,प्रसन्न मोडक, गिरीश जैन,मधुकर पाटील,ओमप्रकाश मौर्य,मितेश शहा ,महेश झिंजे,शितल माळी,सुजाता जाधव आदी उपस्थित होते.
तर आई डे केअर च्या स्वाती मोहिते यांनी स्टॉल लावला होता . या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांनी दांडिया रास व कोजागिरीचा आनंद लुटला.
0 Comments