शिरवली ग्राम पंचायत निवडणूकीच्या प्रचाराला वेग,खोटी माहिती देत प्रचार करणाऱ्यांचे पितळ उघडे होणार......माजी सरपंच शैलेश मोरे
पाताळगंगा न्यूज : हनुमंत मोरे
वावोशी / खोपोली : ३१ ऑक्टोबर,
मागील तीन टर्म मी शिरवली ग्राम पंचायतीचा सरपंच म्हणून काम केले आहे.या काळात सत्ताधारी पक्षाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील विकास कामांना विकास निधी आणण्यात आला.हा निधी तात्कालीन युवासेना तालुका अधिकारी व पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तेथील विकास कामे करण्यासाठीचे आदेश आम्ही त्याला दिले याचा अर्थ त्यांनी तो विकास केला असे नाही तर तो फक्त त्या कामाचा ठेकेदार होता.आता शिवसेनेचा उमेदवार वेगळा असून झालेला विकास हा शिवसेनेच्या माध्यमातून झाला असल्याने येथील मतदार शिवसेना आघाडीच्या उमेदवारांना निवडून देतील.आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार अमर मानकावळे व सर्व सदस्य सहकारी मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास शिरवली ग्राम पंचायतीचे माजी सरपंच शैलेश मोरे यांनी व्यक्त केला आहे.
शिरवली ग्राम पंचायत निवडणूकीतील प्रचाराचा धुरळा उडायला जोरदारपणे सुरूवात झाली असून प्रत्येक जण आपल्या निशाणी चिन्हाचे पॅम्प्लेट घेऊनच मतदारांच्या दाराजवळ जातांना पहायला मिळत आहेत.आघाडीचे उमेदवार अमर मानकावळे यांच्या प्रचारासाठी माजी सरपंच शैलेश मोरे यांनी कंबर कसली असून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना देत अमर मानकावळे यांच्या प्रचारात सहभागी होण्यास सांगितले आहे.आम्ही केलेल्या विकास कामांचे श्रेय विरोधक घेत असल्याने ते सर्वसामान्य लोकांना माहित असावे यासाठी माजी सरपंच शैलेश मोरे यांनी शिवसेना आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या प्रयत्नामुळे ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील विकास कामांना मिळालेला निधी आणि या निधीच्या माध्यमातून झालेली विकास कामे यांचे फुकटचे श्रेय विरोधक घेण्याचा प्रयत्न करीत आहेत तरी मतदारांनी या सर्व भूल थआपआंनआ बळी न पडता आघाडीचे उमेदवार अमर मानकावळे यांच्यासह सर्व पॅनलला भरघोस मतांनी निवडून द्यावे आणि देतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
अमर मानकावळे यांच्या प्रचार रॅलीला मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत असून शेकडो तरूण कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतल्याचे चित्र सध्यातरी पहायला मिळत आहे.
___ कोट -
आगामी काळात लोकांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागेल याचा विचार करून ग्राम पंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचा माझा निश्चय आहे.लोकांना माझ्याकडून त्यांची अपेक्षा पूर्ण होईल असा विश्वास असल्याने त्यांनी दिलेल्या शब्दावर आणि त्यांच्या विश्वासावर मी या निवडणूकीचा आखाड्यात उतरलो आहे.राजकारण हा आमच्या कुटुंबाचा विषय नाही मात्र राजकारणाची कास पडल्याशिवाय उत्तम समाजसेवा करता येत नाही म्हणूनच मी राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा करण्यासाठी ग्राम पंचायतीची निवडणूक लढवित आहे.मला विश्वास आहे, मतदार मला पूर्ण पाठिंबा देत असल्याने माझा विजय पक्का झाला आहे. (अमर मानकावळे )
0 Comments