राजिप शाळा वडगांव झाली डिजिटल,ग्रुप ग्राम पंचायत वडगांव सरपंच सह सदस्य यांचे योगदान
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
वडगांव : ३० ऑक्टोबर,
रायगड जिल्हा परिषद शाळा वडगांव आता डिजिटल स्वरूपात पाहण्यास मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेह-यावर समाधानाचे हास्य झळकल्यांचे दिसून आले.दिवसेंदिवस विविध शाळा डिजिटल होत असल्यामुळे मुख्याध्यापक सुभाष राठोड यांनी ग्रुप ग्राम पंचायत वडगांव सरपंच गौरी महादेव गडगे यांच्या कडे डिजिटल उपकरण हवे असल्याचे सांगितले.यावेळी सरपंच सह ग्रामसेवक, सदस्य यांनी या शाळेला डिजिटल करण्यासाठी अनुमती देवून ती डिजिटल करण्यात आली.
डिजटल असल्यामुळे या संगणक प्रणाली मुले विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत असते.त्याच बरोबर विद्यार्थ्याना चित्र फित च्या माध्यमातून सांगितले की लगेच स्मरणात राहत असते.यामुळे,संगणक प्रणाली विद्यार्थ्यांसाठी किती महत्वाची आहे.हे शिक्षकांना त्यांची कल्पना असून या शाळेच्या संगणक डिजिटल प्रणाली किट दिल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करणे अगदी सोपे जाणार आहे.मराठी शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विuकास होण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असते.यामुळे या शाळेला डिजटल स्वरूप देण्यात आले.
राजिप शाळा वडगांव ही डिजटल झाली असून हे पाहण्यासाठी केंद्र प्रमुख तसेच अधिकारी यांनी शाळेला भेट देऊन ही शाळा डिजिटल करण्यासाठी त्यांनी केलेले सहकार्य, विद्यार्थ्यांच्या भविष्यांचा वेध घेणारा ठरेल असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.यावेळी केंद्र प्रमुख केंद्रजगतसिंग परदेशी ,मुख्याध्यापक सुभाष राठोड,उप शिक्षक वैजनाथ जाधव उपस्थित होत
0 Comments