रोटरी क्लब ऑफ पेण तर्फे आयुर्वेदिक अगरबत्तीची निर्मिती

 रोटरी क्लब ऑफ पेण तर्फे आयुर्वेदिक अगरबत्तीची निर्मिती




पाताळगंगा न्यूज : दिपक जगताप 
खालापूर : ३१ ऑक्टोबर,


                रोटरी क्लब ऑफ पेण तर्फे दिनांक २९  ऑक्टोबर रोजी रामवाडी येथे गरजू महिलांना गणपतीत गोळा केलेल्या निर्माल्यापासून अगरबत्ती बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. गरजू महिलांना घरातल्या घरात स्वयंरोजगार करता यावा हा या मागचा उद्देश होता. नुकत्याच साजरा झालेल्या गणपती उत्सवामध्ये रोटरी क्लब ऑफ पेण आणि इनरव्हील क्लब ऑफ पेण यांच्या संयुक्त विद्यमाने निर्माल्य गोळा करण्याचा प्रोजेक्ट राबविण्यात आला होता. या निर्मला चा काही भाग हा खत निर्मितीसाठी वापरण्यात आला तर काही फुले सुकवून ,वाळवून त्यापासून अगरबत्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्याचे ठरवण्यात आले. 
                  त्याप्रमाणे निर्माल्यावर योग्य ती प्रक्रिया करून नंतर त्यापासून अगरबत्ती तयार करण्याचे प्रशिक्षण या महिलांना देण्यात आले. इनरव्हील क्लब ऑफ पेण सदस्या सुचिता म्हात्रे यांनी हे प्रशिक्षण देण्याचे मोलाचे काम केले. या प्रशिक्षणामध्ये जवळपास ६०  महिलांचा सहभाग होता. या उपक्रमामुळे निश्चितच या महिलांना स्वतःचा स्वयंरोजगार करण्याची योग्य ती संधी मिळाली आहे. या स्तुत्य उपक्रमाला रोटरी क्लब ऑफ पेणच्या अध्यक्ष मधुबाला निकम, सेक्रेटरी जयेश शहा,इनरव्हील क्लब ऑफ पेणच्या अध्यक्ष सौ ज्योती अवघडे तसेच इनरव्हील सदस्य आवर्जून उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण