सामाजिक कार्यकर्ते - भगवान जाधव यांचा महाविकास आघाडीला विरोध

 सामाजिक कार्यकर्ते - भगवान जाधव यांचा महाविकास आघाडीला विरोध




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
माजगांव / आंबिवली - २० ऑक्टोबर
  
               ग्रूप ग्राम पंचायत माजगांव निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या सदस्य तसेच थेट जनतेतून सरपंच पदासाठी उभे असलेल्या महाविकास आघाडीच्या सर्व  उमेद्बारांने निवडणूकीचे अर्ज दाखल करण्यात आले.असून, मात्र या महाविकास आघाडीला पुर्णपणे विरोध असल्यांची आक्रमक भुमिका सामाजिक कार्यकर्ते भगवान जाधव यांनी व्यक्त केली.कारण महाविकास आघाडी पक्षांच्या विचारांवर चालत नसल्यांची भावना त्यांनी व्यक्त केली.या निवडणूकीत माझ्याजवळ २०० च्या आसपास मतदान असून माझ्या माध्यमातून मतदान करतील असे ही त्यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
                जाधव यांनी महाविकास आघाडीला काही प्रस्ताव ठेवण्यात आल्यांचे समजते मात्र त्यांना ते मान्य नसल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये होणार आता बिघाड असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.सदर मला न विचारातच महाविकास आघाडीच्या, माध्यमातून उमेद्वार अर्ज भरले असून त्यांचा हा प्रयत्न आपण यशस्वी होवू देणार नाही. आणी मी  सातत्याने त्यांच्या विरोधात राहणार आहे. 
            गेले अनेक वर्ष राजकारण करीत असतांना शिवाय ग्रामपंचायतीचा भ्रष्ट कारभार आपण चव्हाट्यावर आणले असून यापुढे असे प्रकार आपण खपवून घेणार नाही.माझ्या विरोधात जे गेले त्यांना यश येणार नाही. या मध्ये तीळ मात्र शंका नाही. मात्र महाविकास आघडीचे राजकारण चुकीच्या पद्धतीने करीत असल्यामुळे मी सामाजिक कार्यकर्ता भगवान जाधव यासाठी रस्त्यावर उतरुन विरोधकांना झोपविल्याशिवाय शांत बसणार नाही.
 

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन