कोल्ही गाव हे स्वतंत्र्य गाव म्हणून जाहीर करण्याची पारगाव ग्रामपंचायतीची मागणी

 कोल्ही गाव हे स्वतंत्र्य गाव म्हणून जाहीर करण्याची पारगाव ग्रामपंचायतीची मागणी



पाताळगंगा न्यूज : संजय कदम 
पनवेल : २० ऑक्टोबर,

                  कोल्ही गाव हे स्वतंत्र्य गाव म्हणून जाहीर करण्याची मागणी पारगाव ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली असून याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे तसेच गट विकास अधिकाऱ्यांकडे दिले आहे. 
               पारगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत कोल्ही हे गाव अंतरराष्ट्रीय विमानतळ सोडत असल्यामुळे त्याचे पुर्नवसन झाले आहे. सदरचे पुर्नवसन वडघर हद्दीतीन झाले असल्याने सदरचे कोल्ही गाव हे स्वतंत्र्य गाव म्हणून घोषित करावे व त्याची स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात यावी अशी मागणी रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे आणि पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
                   यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळाराम नाईक यांच्यासह कोल्ही गावातील पंच कमिटी अमृत भोईर, नारायण भोईर, संतोष राजेंद्र भोईर, प्रवीण भोईर, सुधीर नाईक, चंद्रकांत भोईर, संतोष शंकर नाईक, साहिल नाईक, हितेश नाईक, राजेश भोईर आदी उपस्थित होते. तत्पूर्वी त्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना सुद्धा या मागणीचे निवेदन सुद्धा दिले होते. त्यांनी सुद्धा याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन