कामावरून कमी केलेले १६ कामगार पुन्हा सेवेत घेणार , थरमॅक्स केमिकलच्या आश्वासनानंतर उपोषण तात्पुरते स्थगित
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
पौध : २९ मे,
ग्रुप ग्राम पंचायत माजगांव हद्दितील असलेला थरमॅक्स कॅमिकल हा कारखाना असून या ठिकाणी गेली २२ वर्ष येथे काम करीत असलेल्या १६ माथाडी कामगारांस व्यवस्थापक यांने कोणतीही नोटीस न देता कामावरुन काढून टाकल्यामुळे येथिल स्थानिक कामगारावर उपासमारीची वेळ आहे.मात्र आम्हाला कामावर घ्या नाहितर गेटसमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता.अखेर व्यवस्थापक कामावर घेण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, कामगारांनी उपोषण तात्पुरते स्थगित करीत असल्याचे सांगितले. त्यामुळे सदर कामगारांचा प्रश्न काही काळापुरता तरी सुटला आहे.
खालापूर तालुक्यातील पौद येथील थरमॅक्स केमिकल कंपनी व्यवस्थापक यांने १६ कामगारांना एप्रिल महिन्यात कोणतीही पूर्वसूचना न देता कामावर कमी केले होते. यामुळे सदर कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. दोन महिने पगार नसल्याने कंपनी व्यवस्थापकांस उपोषणाचा इशारा दिला होता. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे यांच्या मध्यस्थीने सदर कामगारांना अटीशर्थीवर कामावर घेण्याचे कंपनी प्रशासनाने मान्य केले आहे.
दरम्यान, संतोष बैलमारे यांनी सांगितले की, पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या सूचनेनुसार कामगारांच्या पहिल्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. तसेच, सदर कामगारांना पुन्हा सेवेत घेणार आहेत. मात्र, भाई जगताप अध्यक्ष असलेल्या भारतीय कामगार युनियनमध्ये सामावून घेणार असल्याचे ही सांगितले. तर, कोणत्याही अटींशिवाय कंपनीत सामावून घेणार असल्यास सर्वतोपरी सहकार्य करू, असे कामगारांनी सांगितले.
0 Comments