सरिता कमलाकर वाघे यांची महाविकास आघाडीतून बिनविरोध निवड

 सरिता कमलाकर वाघे यांची महाविकास आघाडीतून बिनविरोध निवड 






पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
माजगांव / आंबिवली : २४  ऑक्टोबर,

 
                  महाविकास आघाडीच्या माध्यमातून  पौध आणी माजगांव अदिवासी वाडीतील ग्रामस्थांनी एकत्र ऐवून एकजुटीने सरिता कमलाकर वाघे प्रभाग क्रमांक २  मधून यांची बिनविरोध निवड करुन विजयांचे खाते उघडण्यात आल्यामुळे  सर्व स्तरातून तीचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी  उपस्थित पदाधिकारी महाविकास आघाडीच्या सर्व  उमेद्वारांनी पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
             




   सरिता कमलाकर वाघे यांची बिन विरोध निवड झाल्यांचे समजताच,चाहत्यांनी एकच जल्लोष करण्यात आला.यावेळी खालापूर येथे जावून बिनविरोध उमेद्वारी अर्ज भरण्यात आले.ग्रामस्थांनी घेतलेल्या या कौतुकास्पद निर्णयामुळे सरिता वाघे बिनविरोध निवड झाली आहे.गावातील समस्या अथवा कोणतेही निर्णय सामजस्यपणे घेतल्यामुळे गावातील विकासाच्या कामाला खिळ बसत नाही.शिवाय कोणतेही काम विरोधकामुळे खितपत पडत नाही.ते मार्गी लागले जाते.यांचा पुर्व आभ्यास करुन,एक विचारांने घेतलेल्या या  निर्णयामुळे त्यांचे कौतुक  करण्यात आले.


                 कोणत्याही गोष्टींला विरोध करुन हाती काहीही मिळत नसते.शिवाय या मध्ये एकाला पराभवाला सामोरे जावे लागते.आपल्यामध्ये वाद होवू नये.शिवाय गावाचा विकास व्हावे या सर्व बाबीचा आभ्यास करुन येथिल ग्रामस्थांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेद्वारी देवून बिनविरोध देण्यात आले.आपण  विरोध न करता आपण एक पाऊल मागे घेवून केलेले काम अनेकांसाठी  प्रेरणादायी ठरत आहे. दोन्ही अदिवासी बांधावांनी महाविकास आघाडीतून सरिता यांना उमेद्वार म्हणून घोषित करून विजयांची खाते उघडण्यात आले आहे.
                     

           

  यावेळी खालापुर येथे माहाविकास आघाडीचे बहुसंख्येने पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी  एकनाथ (  भाऊ ) पिंगळे,राजेश पाटील,रमेश जाधव, किशोर पाटील, नरेश पाटील अविनाश कांबळे मंगेश पाटील, दीपाली पाटील, विलास कांबळे,रवी पाटील,सुरेश महाब्दि,रवी दिवाणे,यशवंत शिंदे, मंगेश महाब्दी, देहू पाटील अदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

बेचकीच्या अचुक लक्षवेध ठरला तिसरीचा विद्यार्थी  सोहम पवार