गौतमी पाटील यांचा कार्यक्रम कराल तर याद राखा

 गौतमी पाटील यांच्या कार्यक्रम पनवेल तालुक्यात आयोजित कराल तर याद राखा : क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा रुपालीताई शिंदे आक्रमक








पाताळगंगा न्यूज : संजय कदम 
पनवेल : ७ ऑक्टोबर,

          पनवेल तालुक्यातील कामोठे येथे राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवार गटाचे महाराष्ट्र राज्य संघटक सचिव राजकुमार पाटील यांनी सबसे कातील गौतमी पाटील हिचा नृत्याचा कार्यक्रम ठेवला आहे.
नुकताच कोल्हापुरात गौतमीच्या कार्यक्रमांना तुफान विरोध झाला होता. त्यानंतर कोकणातील सिंधुदुर्गमध्ये आयोजित गौतमीच्या लावणीचा शो देखील रद्द करण्यात आला होता.
            आपल्या अदांनी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलचं नाव सध्या महाराष्ट्रभर गाजत आहे. मात्र, आता गौतमीला अनेक ठिकाणांहून विरोध होताना दिसत आहे. कोल्हापुरात गौतमीच्या कार्यक्रमांना तुफान विरोध झाला होता. त्यानंतर  कोकणातील सिंधुदुर्गमध्ये आयोजित गौतमीच्या लावणीचा शो देखील रद्द करण्यात आला होता. कामोठे ही वारकरी सांप्रदाय असलेली तसेच डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांना मानणारी भूमी आहे त्यामुळे या पावन भूमीत आज रोजगार, शिक्षण, वीज, पाणी, रस्ते, शिक्षण यासारखे मूलभूत प्रश्न जैसे थे आहेत तरी आपण गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमास परवानगी देऊ नये त्यानंतरही कार्यक्रम झाल्यास आम्ही क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनतर्फे हा कार्यक्रम उधळून लावू व त्यास संपूर्ण जबाबदार प्रशासन असेल याची नोंद घ्यावी तसेच रुपालीताई शिंदे ह्यांनी मा. पोलीस आयुक्त सो.नवी मुंबई पोलीस, आयुक्तालय,प्रति,मा.मुख्यमंत्री
मा. उपमुख्यमंत्री,मा. गृहमंत्री,मा. सांस्कृतिक मंत्री
मा. विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य,मा. खासदार मावळ,मा. आमदार पनवेल यांना मेल द्वारे पत्र पाठविले आहे.

Post a Comment

0 Comments

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चौक,देवनाव्हे येथे रक्तदान शिबीर,भारतीय जनता पार्टी पुढाकार,