देवा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

 नवनिर्वाचित उपसरपंच देवा पाटील यांच्यावर होत आहे विविध राजकीय पक्षांसह अनेक मान्यवरांचा शुभेच्छांचा वर्षाव



पाताळगंगा न्यूज : संजय कदम 
पनवेल : १८ ऑक्टोबर,

                 नवनिर्वाचित उपसरपंचपदी देवा पाटील यांची बिनविरोध निवड होताच यांच्यावर अनेक मान्यवरांसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
               देवळोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाचे पुरोगामी युवक संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवेंद्र पाटील यांची ग्रामपंचायतीच्या सरपंच राजश्री राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीदरम्यान शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायणशेठ घरत, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर निवड प्रक्रिया पार पडली. 
                यावेळी देवा पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम ज. म्हात्रे, ज्येष्ठ नेत्या माधुरी गोसावी, जिल्हा परिषद सदस्य विलास फडके, संतोष पाटील, पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती गजानन माळी, पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य जगदीश पवार, तसेच पनवेल तालुका सरचिटणीस ज्ञानेश्वर नाना मोरे, करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे, चंद्रकांत भोईर, देवळोलीच्या सरपंच राजश्री राजेश पाटील, 
             मावळते उपसरपंच पी. पी. पाटील, मामा मुकादम, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवेंद्र मढवी, माजी सदस्य संदीप गणेश पाटील, ज्येष्ठ नेते भगवान कोंडीलकर, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव भरत पाटील, जगदीश मुकादम, ग्रामपंचायत सदस्य काजल मंगेश पाटील, मनस्वी मनोज भंडारकर, आदिती अविनाश गव्हाणकर, विनोद एकनाथ पाटील, ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका वैशाली पावसकर, लेखनिक नेहा पाटील, कर्मचारी राजेश सखाराम पाटील, सहकारी राजेश शंकर पाटील, मंगेश नामदेव पाटील, मनोज काशिनाथ भंडारकर, माजी सदस्य धना चांगु पाटील, माजी उपसरपंच सुशांत जनार्दन पाटील आदींसह मित्र परिवार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

एक्झॉमोबिल कंपनी कडून विद्यार्थ्यांस शैक्षणिक साहित्य वाटप