विद्यार्थ्यांना घडवून निर्माण झालेली नवदुर्गा वर्षाराणी चंद्रकांत मुंगसे नवदुर्गा

 विद्यार्थ्यांना घडवून निर्माण झालेली नवदुर्गा   वर्षाराणी चंद्रकांत मुंगसे नवदुर्गा 





पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
संकलन : सुभाष राठोड ( राजिप शाळा वडगांव 
१८ ऑक्टोबर,


                आई-वडील शेतकरी परंतु उच्चशिक्षित असल्यामुळे लहान वयातच घरापासूनच शिक्षणाची सुरुवात झाली. आई अतिशय शिस्तप्रिय असल्यामुळे लहान वयातच शिस्त लागली. तसेच चुलते देखील दापोडी येथे सार्वजनिक बांधकाम खाते यामध्ये खात्यात उच्च पदावर कार्यरत असल्याने आणि दुसरे, चुलते निगडी येथे व्यावसायिक असल्याने ग्रामीण आणि शहरी संस्कृती जवळून पाहता आली. पुढे १२ वी आर्ट मध्ये श्री शिवाजी विद्यामंदिर चाकण येथे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतर स्वतः लहानपणीच शिक्षक होण्याचे ठरविल्यामुळे एरंडवणे येथील कांताबाई पानसरे अध्यापक विद्यालय ( इंग्रजी मिडियम)  मध्ये डी. एड च्या कोर्स पूर्ण केला..
              सुरुवातीला नारायणगांव येथील ग्रामोन्नती मंडळाचे अनंतराव कुलकर्णी शंग्लिश मिडियम व न्यू इंग्लिश स्कूल मंचर (लांडेवाडी) येथे काही वर्ष काम केले. त्यामुळे याठिकाणी विविध राज्यातील शिक्षकांसोबत काम करण्याचा अनुभव मिळाला यातूनच व्यक्तीमत्व विकास होत गेला.यानंतर २०१० ची CET ची परीक्षा उत्तीर्ण' होऊन  रायगड जिल्हयातील केंद्रशाळा - घाटाव ता. रोहा येथे जुलै २०११ मध्ये रुजू झाले सुरुवातीला इंग्रजी विषयाची अधिक आवड असल्यामुळे या शाळेतील मुलांना परिपाठातून व इतर उपक्रम राबवून इंग्रजीचे घडे दिले. त्यामुळे मुले इंग्रजीतून संवाद साधू लागली. याची दखल तत्कालीन गटशिक्षणाधिकारी काप घेतली आणि ऑगस्ट २०१२ मध्ये पुणे येथे होणाऱ्या 
ब्रिटीश कौन्सिलच्या परिक्षेसाठी पाठवले.                                     परिक्षेत पास झाल्यामुळे शिक्षण सेवक कालावधीत ब्रिटिश कौन्सिल चे तज्ञ मार्गदर्शक म्हणून रायगड जिल्हयात रोहा, माणगाव, महाड, खालापूर आणि पाली येथे सतत दोन वर्ष काम केले. यासोबतच तालुकास्तरीय इंग्रजी, गणित स्पर्धेत शाळेला अनेक बक्षिसे मिळवून दिली. तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत देखील पहिल्याच वर्षो द्वितीय क्रमांक प्राप्त. ब्रिटिश कौन्सिल बरोबरच, स्पोकन इंग्लिश प्रोग्रॅम, तेजस प्रकल्पा अंतर्गत TAG Coordinater म्हणून काम केले.
            २०१६ मध्ये धोंडवार तर्फे बिरवाडी येथे बदली झाली. हा ग्रामीण भाग असल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना सुद्धा शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत विविध उपक्रम राबवून विदयार्थ्यांच्या मनात शाळेबद्दल गोडी निर्माण केली. या ठिकाणी मला सह‌शिक्षक म्हणून लाभलेले  नंदकिशोर विश्वनाथ सोनवळे सर हे अभ्यासू आणि तंत्रस्नेही असल्या कारणाने त्यांच्या तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही स्वतःचा 'यूट्यूब' चॅनल सुरू केला त्यावर विदयार्थ्यांच्या इंग्रेजी विषयाशी संबंधित विविध उपक्रम प्रकाशित केले. याचा परिणाम म्हणून इयत्ता पहिली ते चौथी ची मुले अस्खलित इंग्रजीतून संभाषण करू लागली. तालुक्यात शाळेचा नावलौकीक झाला.
                २०१९ मध्ये रा.जि.प. शाळा खाबेरे येथे बदली या ठिकाणी मी एकाशिक्षिकी शाळा चालवली. परंतु याच कालावधीत मला खूप शिकायला मिळाले. शिक्षक म्हणून उत्तम कार्य तर होतेच परंतू कार्यालयीन काम व प्रशासनातील नियमांचा अभ्यास या ठिकाणी करायला मिळाला. शाळेतील विदयार्थ्यांच्या प्रगती सोबतच गावकऱ्यांच्या सहकार्याने या शाळेतील भौतिक सुविधा वाढवण्यावर अधिक लक्ष दिले. माझ्या कारकिर्द्धित शाळेची आवारभिंत, पाण्याची टाकी, हॅन्ड वॉश स्टेशन, पाइपलाइन, भांडी घासण्यासाठी ओटा, गॅस कनेक्शन अशी कामे करण्यात आली. यासाठी लागणारी शेगडी गावातील दानशूर व्यक्ती म्हणजे पांडुरंग पडवळ यांनी दिली. सोबतच परसबाग निर्मिती करण्यात आली.
                  यात विविध फळझाडे, फुलझाडे व भाज्यांची लागवड करण्यात 'आली. या ठिकाणी मला आमच्या जेवण शिजवून देणार्‍या आईंची (श्रीमती. मंदा रामा गोरीवले) खूप साथ मिळाली. यामुळे गावक-यांचा  शाळेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला.  त्यांचा शाळेतील सहभाग वाढला. शाळा डिजटल झाली.
            उल्लेखनीय कार्य :-
ब्रिटिश कौन्सिल, स्पोकन इंग्लिश प्रोग्रॅम मध्ये तज्ञ मार्गदर्शक,  विज्ञान व गणित विषयासाठी IRISE प्रोजेक्ट मध्ये जिल्हा स्तरीय तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम, विदिशा कार्यपुस्तिकेतून लेखन, पुणे येथील Open book university मध्ये १ ली ते 10 वी च्या अभ्यासक्रमासाठी  इंग्रजी विषयातील अभ्यास गटात सहभाग व लेखन. कोकण एज्युकेशन सोसायटी च्या जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत परीक्षक म्हणून सलग दोन वेळा सहभाग. 

पुरस्कार :-

English language brand ambassador
 of Raigad District (2017) मा. गजानन पाटीन (प्राचार्य DIET- पनवेल) यांच्या हस्ते प्राप्त. 
तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार- २०१९

वर्षाराणी चंद्रकांत मुंगसे
  :- मूळगाव मु. पो रासे, ता राजगुरुनगर, जि. पुणे

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन