महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार, सर्व उमेद्वार बहुमतांनी निवडून येणार,मतदार राज्यांनी दिल कौल
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
माजगांव / आंबिवली २७ ऑक्टोबर,
ग्रूप ग्राम पंचायत माजगांव निवडणूकीच्या रिंगणात उभे असलेले,थेट जनतेतून सरपंच आणी सदस्य पदासाठी उभे असलेले उमेद्वार यांना चिन्ह वाटप करण्यात आले. असून आज सायंकाळी ४ : ०० वाजता महाविकास आघाडीच्या सर्व अधिकृत उमेद्वार यांचा विठ्ठल रखुमाई मंदिर माजगांव येथे प्रचारांचा नारळ फोडणार असल्यामुळे या प्रचारांच्या चर्चेला उधान आले आहे.शुक्रवार हा दिवस ख-या अर्थाने आपल्याला प्रचारांचा शुभ मुहुर्त ठरण्यात आले आहे. यामुळे तरुण वर्गांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तरुण वर्गांना आता राजकीय भाषेचे ज्ञान असून आपला कोण ? परका कोण यांचे ज्ञान असल्यामुळे मतदान कोणांस केल्यांने गावाचा विकास होईल या कडे तरुण वर्गांचे लक्ष केंद्रित झाले.आज तरुण वर्ग माहिला वर्ग यांच्या अनेक समस्या निर्माण होत असतांना,निवडणूकीत निव्वळ आश्वासन न देता त्या पुर्ण करण्यांचा संकल्प या महाविकास आघाडीच्या उमेद्वार यांनी घेतला आहे.
या प्रचारांस बहुसंख्येने मतदार राजा उपस्थित राहणार असे समजते.काही वेळात प्रचारांची सभा समवेत प्रचार यात्रा सुरु होणार आसल्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज प्रचारांची रण धुमाळी सुरु होणार असून या मागील एकच उदिष्टे की,मतदार जागृत असणे,आपले कोण परके कोण यांची जाणीव निर्माण होण्यासासाठी आणी मतदानांच्या दिवशी उमेद्वारांचे पारडे जड होवून बहुसंख्येने निवडून येण्यासारखे आज या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले असून बहुसंख्येने मतदार राजा उपस्थित राहण्यांचे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments