विठ्ठल रखुमाई मंदिर येथे श्रीफळ वाढवून महाविकास आघाडीच्या प्रचारांचा शुभारंभ

 विठ्ठल रखुमाई मंदिर येथे श्रीफळ वाढवून महाविकास आघाडीच्या  प्रचारांचा शुभारंभ 





पाताळगंगा  न्यूज : वृत्तसेवा 
 माजगांव / आंबिवली, २८ ऑक्टोबर,

                 महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज ख-या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली. माजगांव येथिल असलेल्या विठ्ठल रखुमाई च्या मंदिरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आणी रिंगणात उभे असलेले थेट जनतेतून सरपंच तसेच सदस्य यांच्या हस्ते आणी गावातील प्रतिष्टीत तसेच मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. हिंदूंचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांस हार अर्पण करून तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडर यांच्या पुतळ्यांस हार अर्पण करून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद पाहावयास मिळाला. यावेळी प्रचारांस यात्रेसारखे स्वरूप प्राप्त झाल्याचे पाहावयांस मिळाले.यावेळी तरुण वर्ग महिला वर्ग या प्रचाराच्या ठिकाणी पहावयांस मिळाल्या. 


               महाविकास आघाडीला मत म्हणजे विकासाला मत अश्या घोष वाक्यांनी माजगाव,वारद हा परिसर विजयाच्या ललकारांनी गर्जून उठलेले पहावयास मिळाले. हातामध्ये पक्षाचे चिन्ह असलेल्या पत्रिका उमेद्वारांचे फोटो देऊन महाविकास आघाडीच्या सर्व उमेद्वार यांना निवडून आण्यांची जबाबदारी तुमच्या आहे.ग्रामस्थ्यांचा मिळत असलेले प्रेम हे नक्कीच विजयाचे प्रतीक असल्याचे पाहावयांस मिळाले.आपले विचार हे शुद्ध पाण्यासारखे असून ग्रामस्थांच्या समस्यां सोडविण्यासाठी आम्ही या निवडुकीच्या रिंगणात उभे असून त्यांचे सुवर्ण निर्माण करण्याची ताकत तुमच्या हाती आहे.असे मत उमेद्वारांनी मतदार राजांस सांगितले. 
           



       यावेळी प्रचाराच्या शुभ प्रसंगी   खालापूर तालुका शिवसेना प्रमुख    एकनाथ पिंगळे यांनी यावेळी आपले विचार  मांडताना म्हणाले की पक्षा कडुन  उमेद्वारी दिली असून विजयांचा शिक्का मुहुर्त झालेला आहे.सर्व कार्यकर्ते एकवटून काम करीत असतांना आपण विजयापर्यंत पोहचलो आहे.नाराज होणारी लोकांची संख्या जरी असली तरी समजून घेणारे असे कार्यकर्ते आपल्यामध्ये आहे. पाच  तारखेला मतदान होणार असून सहा तारखेला आपण विजयात रूपांतर होणार आहे.विरोधक आपली दिशाभूल करतील मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करून त्यांचा डाव उधळून लावून महाविकास आघाडीचे सर्वच उमेद्वार  बहुसंख्येने निवडून आण्यांची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे.असे मनोगत प्रचारांच्या शुभ मुहूर्तवार बोलले.
              उत्तम शेठ भोईर यांनी सुद्धा महाविकास आघाडी चे सर्व उमेद्वार भरघोष मतांनी निवडून येथिल जिथे विकास करणारे उमेद्वार असते त्यांचे पारडे जडच असते असे मत त्यांनी व्यक्त केले.
           

 यावेळी 


खालापूर तालुका शिवसेना प्रमुख - एकनाथ पिंगळे, संपर्क प्रमुख - आत्माराम पाटील ,शिवसेना नेते-  उत्तम भोईर  निखिल पाटील युवा सेना नेते, राजेश ढवालकर विभागप्रमुख प तू पाटील मा सरपंच, कालुराम लभडे, अनंत लभडे  हरिभाऊ लभडे, बबन शिंदे, वामन शिंदे,सीताराम लभडे , मंगेश लभडे, शिवाजी शिंदे,कालुराम पाटील  आत्माराम काठवले, सूर्याजी पाटील, सुरेश महाब्दी सुधाकर महाब्दी, पितांबर महाब्दी, मंगेश पाटील, चंद्रकांत जाधव,संदिप जाधव,भरत पाटील, गोपीनाथ पाटील, शेकाप नेते चंद्रकांत पाटील जयवंत पाटील, नथुराम कांगे, विलास कांबळे, आर पी आय नेते अविनाश कांबळे,देवराम कांबळे तसेच राष्ट्रवादी चे रणधीर पाटील मॅचिंद्र पाटील दिलीप काठवले मनसे चे नितीन महाब्दी तसेच जयेश पाटील कृष्णा पाटील रविंद्र पाटील मारुती ढवाळकर किरण पाटील वसंत कांबळे अदि बहुसंख्येने उपस्थित होते .


Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर