श्रीसंत बाळू मामा मंदिरात मामांचा जन्मोत्सव साजरा.... भक्तांनी घेतला दर्शनाचा लाभ
पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे
खालापूर : २६ ऑक्टोबर,
असंख्य भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या लोणावळ्यातील श्री संत बाळू मामा मंदिरात आज जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडून विविध कार्यक्रम पार पडले,
यावेळी सकाळी लोणावळा पांगोळी येथील श्रीसंत बाळू मामा मंदिरात सकाळी ६ वाजता श्रीचा अभिषेक ,७ वाजता आरती, ११ ते ४ वाजेपर्यंत सिद्धेश्वर भजनी मंडळ तुंगार्लि, आणि यशवंत भजनी मंडळ कातवी यांचे भजन, ४वाजता, पाळणा, आणि ५ ते ७वाजेपर्यंत ह भ प चंद्रकांत महाराज वांजळे यांचे कीर्तन पार पडून नंतर सायंकाळी ७ वाजता महाप्रसादाचा अनेक भक्तांनी लाभ घेतला,
रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी हे मंदिर असल्याने या मंदिरात दररोज अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात, त्याच आज श्री संत बाळूमामा देवाचा जन्मोत्सव असल्याने सकाळ पासूनच असंख्य भक्तांनी गर्दी असून भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला, यावेळी सर्वच भाविक भक्तांची देवस्थांन कमिटीच्या आणि ग्रामस्थांच्या वतीने चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती,
0 Comments