कै. सुभाष बाबू पाटील यांच अल्पशा आजाराने निधन पाटील कुटुंबातील आधारवड हरपला
पाताळगंगा न्यूज : दीपक जगताप
खालापूर : २९ ऑक्टोबर,
खालापूर तालुक्यातील आडोशी गावात राहणारे कै.सुभाष बाबू पाटील यांचे राहत्या घरी दि २१ ऑक्टोबर रोजी अल्पशा अजाराने निधन झाले.ते वयाच्या ६८ वर्षाचे होते.त्यांच्या अंत्यविधी ससामाजिक,राजकीय,शैक्षणिक,उद्योजक आशा विविध स्तरातील मान्यवर त्यांच्या अंत्य दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते. पाटील कुटुंबाचा आधारवड हरपला,असून त्यांची ही सुरुवात संघर्षातून झाली आपल्या वडीलांना हातभार लावावे या उद्दात विचारांतून सायकलवरुन खोपोली ते आडोशी प्रवास करीत असे यामुळे नोकरी करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र नोकरीवर न थांबता त्यांनी स्वताचा व्यवसाय करण्यांचे नियोजन केले आणी १९९५ ला ट्रान्सपोर्ट क्षेत्रात पदार्पण केले. आणी आज आतकरगाव,ढेकू परिसरात एक नामवंत म्हणजे व्यवसायांचा ठसा उमटवला आहे. तसेच गेली २० वर्षे श्री सदस्य बैठकीतुन अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यांत त्यांचे मोठे योगदान असल्यांचे बोलले जात आहे.
त्यांचा या मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी अनेक माणसे जोडली गेली.सर्व समाजामध्ये ऐक्यांचे,बंधुत्त्वाचे,शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण होण्याकरता ते सतत प्रयत्नशील असायचे. ईश्वर भक्ती वर मोठी श्रद्धा होती.अशी व्यक्ती सोडून गेल्यांने त्यांच्या कुटुंब आणि ग्रामस्थ यांच्या वरती शोककला पसरली आहे.
त्यांचे दशक्रिया विधी सोमवार ३० ऑक्टोबर रोजी उद्धर रामेश्वर येथे होणार असून उत्तरकार्य २ नोव्हेंबर,रोजी राहते घरी आडोशी येथे होणार आहे त्यांच्या पश्चात एकूण दोन मुले ,दोन मुली,भाऊ,सुना ,नातवंडे इत्यादी परिवार आहे .सुभाष पाटील यांच्या निधनाने आडोशी पंचक्रोशी ,कर्जत खालापूर मधील नातेवाईक मित्रमंडळी हळहळ व्यक्त करत आहेत.
0 Comments