प्रचारांची तोफेचा आवाज पुन्हा भिडणार,उमेद्वरांची ललकारी मतदार राजा पर्यंत पोहचणार

 प्रचारांची तोफेचा आवाज पुन्हा भिडणार,उमेद्वरांची ललकारी मतदार राजा पर्यंत पोहचणार 






पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
माजगांव / आंबिवली ,२८ ऑक्टोबर,

         ग्रूप ग्राम पंचायत माजगांव च्या निवडणूकीच्या प्रचारांचा आज दुसरा दिवस असल्यामुळे आज प्रचारांची तोफ पुन्हा आवाज घुमणार,काल माजगांव येथिल विठ्ठल रखुमाई चे दर्शन घेवून प्रचारांची सुरुवात करण्यात आली होती.आज पुन्हा त्या विठ्ठूरायांच्या चरणी नतमस्तक होवून प्रचाराला सुरुवात होणार,प्रचार म्हटले की उमेद्वरांची दमछाक होते.मात्र आपल्यावर असलेल्या मतदार राज्यांच्या प्रेमाणे सर्व थकवा दुरु निघून जात असल्यामुळे जिद्दीने प्रचाराला वेग आला आहे.


                 ५ तारखेला मतदान आणी सहा तारखेला निकाल असल्यामुळे उमेद्वारांकडे काही तासांचा अवधि असल्यामुळे जास्तीत जास्त मतदार राजापर्यंत पोहचून महाविकास आघाडीच्या माध्यमातून उभे असलेले सर्वच उमेद्वार यांची ओळख निर्माण करण्यासाठी आणी त्यांना भरघोष मतांनी निवडून आण्यासाठी या प्रचार यात्रेला हजारोच्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती पहावयांस मिळाली, ललकारी ही घुमली आहे.आता फक्त मतदान करुन प्रत्येक उमेद्वार यांना निवडणूक आणा असे भावनिक आवाहन करण्यात या प्रचार यात्रेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
             

ग्रूप ग्राम पंचायत माजगांव ही विकासाकडे वाटचाल करील, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशिल असून तुमच्या पाठीशी आहोत.गावाचा विकास,साधायचा असेल तर ,समस्या तुमच्या काम आमुचे हेच धोरण महाविकास आघाडीच्या सर्व उमेद्वार अवलंब करणार असल्यांचे निवडणूकीच्या रिंगणात उभे असलेले उमेद्वार यांनी पाताळगंगा न्यूज वेब पोर्टल शी बोलतांना सांगितले.आज गावात विविध समस्या आहेत महिला वर्गांना यांची जाणीव आहे.यामुळे कोणत्याही आमिषाला बळी पडू नका,विकास साधायंचा असेल तर महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही.एकदा संधी गेली की पुन्हा नाही.त्यामुळे विचार करा,आपण स्वताला फसवू नका? तुम्ही कुणांचे बांधलेले नाही एक राजा आहोत तुम्ही भविष्य निर्माण करु शकता? यामुळे मतदार राजा जागा हो निवडूनिकाचा धागा हो. असे मार्गदर्शन यावेळी मतदार राजांस देण्यात आले.
           

  या प्रचार यात्रेला आलेले स्वरूप पाहाताच या निवडणुकीत भरघोष मतांनी निवडून येणार असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
              यावेळी विभागप्रमुख - नेते राजेश ढवालकर मा सरपंच-  प .तू पाटील,ग्रूप ग्राम पंचायत वडगांव सदस्य - नंदकुमार पाटील,कालुराम लभडे ,अनंत लभडे,हरिभाऊ लभडे, बबन शिंदे ,वामन शिंदे, सीताराम लभडे, मंगेश लभडे, शिवाजी शिंदे,रमेश जाधव,संदेश जाधव,प्रदीप जाधव,वसंत पाटील, कालुराम पाटील,आत्माराम काठवले,सूर्याजी पाटील, सुरेश महाब्दी ,सुधाकर महाब्दी, पितांबर महाब्दी, मंगेश पाटील, चंद्रकांत जाधव, संदिप जाधव, भरत पाटील, गोपीनाथ पाटील, शेकाप नेते चंद्रकांत पाटील, जयवंत पाटील,नथुराम कांगे, विलास कांबळे,आर पी आय नेते अविनाश कांबळे ,देवराम कांबळे, तसेच राष्ट्रवादी चे रणधीर पाटील, मॅचिंद्र पाटील, दिलीप काठवले, मनसे चे नितीन महाब्दी,तसेच जयेश पाटील,कृष्णा पाटील, रविंद्र पाटील, मारुती ढवाळकर, किरण पाटील, वसंत कांबळे,बाजीराव ढवाळकर,यनाजी पाटील,अमोल पाटील, अदि बहुसंख्येने उपस्थित होते .



Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर