इमॅजिका परिवाराकडून दरडग्रस्त इर्शाळवाडीवासियांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचा प्रयत्न

 इमॅजिका परिवाराकडून दरडग्रस्त इर्शाळवाडीवासियांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचा प्रयत्न




पाताळगंगा न्यूज : गुरुनाथ साठेलकर 
खोपोली : १७ ऑक्टोबर,

                      इर्शाळवाडीवर निसर्गाने अवकृपा केली.  दैनंदिन व्यवहार आटोपून झोपेच्या अधीन झालेली वाडी दरडी खाली गाढली गेली आणि  काही कळण्याच्या आत सर्वांवर दुःखाचा डोंगरही कोसळला. दुर्घटना घडल्यावर इर्शाळवाडीतील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी विविध घटकांनी मदतकार्य केले होते त्यात इमॅजिका (मालपाणी) परिवाराने देखील हातभार लावून खारीचा वाटा उचलला.
                त्याच सेवाभावी प्रयत्नाचा भाग म्हणून त्या दुर्घटनेमुळे इर्शाळवाडीवासियांच्या आयुष्यात हरपलेला आनंदाला परत आणण्याचा किंचितसा प्रयत्न म्हणून इमॅजिका (मालपाणी) ग्रुपचे मालक श्री.मनीष मालपाणी आणि श्री. जय मालपाणी तसेच इमॅजिका मॅनेजमेंटकडून एक दिवसीय सहलीचे आयोजन केले होते. 
                     इमॅजिका (मालपाणी) परिवाराकडून 
सहलीसाठी आलेल्या लहानथोर इर्शाळवाडीवासियांचे जोरदार स्वागत  करण्यात आले. अंतरराष्ट्रीय दर्जाच्या राईड्स मधून सफर करत, विविध खेळांत रमून जात, मनोरंजनाच्या साधनांचा उपभोग घेत आणि मनसोक्त मेजवानीचा स्वाद घेतल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान पसरलेले दिसून येत होते. 
               या कौटुंबिक सहलीच्या आयोजनातून आपण काही क्षणांसाठी का होईना,  इर्शाळवाडीवासियांना त्या दुर्घटनेच्या धक्क्यातून बाहेर काढण्यात यशस्वी झाल्याचे प्रतिपादन इमॅजिका (मालपाणी) परिवाराकडून करण्यात आले.

Post a Comment

0 Comments

अवघा रंग एक झाला,तळवली वारकरी यांच्याकडून पायी दिंडीचे आयोजन