दिशा कल्च रल इव्हेंट प्रस्तुत दिशा महिला मंच आयोजित, नवदुर्गा पुरस्कार व जागर आई दुर्गेचा जल्लोष
रास दांडियाचा कार्यक्रमाचे आयोजन खांदा कॉलनी येथील बेल्लेझा बॅंक्वेट हॉल
पाताळगंगा न्यूज : संजय कदम
पनवेल : २२ ऑक्टोबर,
रास दांडियाच्या जल्लोषात आई दुर्गेचादेखील जागर करण्यात आला.पनवेल मधील प्रसिद्ध 'विश्वास हीच परंपरा'ब्रीदवाक्य असणाऱ्या पटेल ज्वेलर्स कडून आलेल्या सर्व महिलांना आकर्षक भेटवस्तू ही देण्यात आली यावेळी पटेल ज्वेलर्स च्या जनरल मॅनेजर प्रतीक्षा डायेस ,ओरोस्माईल डेंटल क्लिनिक च्या डॉ शिल्पा भंडारवार व डॉ. अमित भंडारवार,देवकी मिडिया या नामांकित इव्हेंट मॅनेजमेंट, ऍडव्हरटाईझ व आयटी सोल्यूशन्स कंपनी चे डायरेक्टर साहिल रेळेकर, प्रतीक फोटोग्राफी चे प्रतीक चव्हाण, समाजिक कार्यकर्ता सुरेश मोरे या मान्यवरांच्या सहकार्यामुळे व उपस्थितीमुळे हा सोहळा यशस्वी झाला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर व मृदुला पुसाळकर, आर के ग्रुप चे डायरेक्टर राजेंद्र कोलकर सर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांना यावेळी सन्मानीत करण्यात आले. यावेळी शॉर्ट फिल्म डायरेक्टर तेजस पाटील, अभिनेत्री प्रीती गायकर, अंजली साखरे, किरण राजपूत उपस्थित होते.यावेळी विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवून उल्लेखनीय कामागिरी करणाऱ्या मृदुला पुसाळकर, भागीरथी कोळकर, अस्मिता अभिजित पाटील,निशा गुडे वैदू,डॉ शर्वरी शैलेश पाटणे,संपादिका कविता लाखे जोशी,
ॲड. सुरेखा प्रशांत भुजबळ,
मयुरा राजेश, डॉ. प्रीती प्रसाद महाजन या नवदुर्गाना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. दिशा महिला मंच हे महिलांच हक्काच व्यासपीठ असून दिशा व्यासपीठाचा नवदुर्गा पुरस्कार सोहळ्याचे पाचवे पर्व उत्साहात व जल्लोषात साजरे झाले. आलेल्या आव्हानाला सामोरे जाऊन प्रतिकूल परिस्थिती अनुकूल बनवत स्वतःला सिद्ध करत समाजातील विविध घटकांच्या उद्धारासाठी स्वतःला झोकून देत कार्य करीत असलेल्या नवदुर्गाना यावेळी सन्मानित केल्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया 'दिशा महिला मंच'च्या संस्थापक अध्यक्षा निलम आंधळे यांनी यावेळी व्यक्त केली.मान्यवरांचे आभार मानत असे उपक्रम नेहमीच दिशा व्यासपीठामार्फत महिलांसाठी राबवले जातील असे संस्थेच्या उपाध्यक्ष विद्या मोहिते यांनी मत व्यक्त केले.
0 Comments