एक दिवस मुद्रांक विक्री बंद

 रायगड जिल्हा मुद्रांक संघटना व खालापूर तालुका मुद्रांक संघटना वतीने आज दिनांक ३० ऑक्टोंबर  रोजी एक दिवस मुद्रांक विक्री बंद



पाताळगंगा न्यूज : दिपक जगताप 
खालापूर : १ नोव्हेंबर,

             महाराष्ट्र राज्यात अनेक मुद्रांक विक्रेते असून शासनाच्या तिजोरी मध्ये लाखो रुपये महसूल जमा करुन देणेचे काम आमचे विक्रेते करत आहेत.पंरतु त्यांचे अनेक प्रलंबित मागण्या कडे हे शासन लक्ष देत नाहीत आता तर हे शासन १००  व ५०० चे मुद्रांक बंद करण्याचे तयारीत आहे त्यामुळे आज रायगड व खालापूर तालुक्यातील सर्व  मुद्रांक विक्रेते यांनी आज विक्री बंद केली ठेवली आहे.
                त्या बाबतीत तसे निवेदन या पुर्वी दिले आहे. तर आज सर्व मुद्रांक विक्रेते यांनी शंभर टक्के  विक्री बंद ठेवले आहे‌ या वेळी। रायगड जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम वाणी  तालुका अध्यक्ष कैलास वाडेकर तालुका सचिव मंगेश चौधरी ,प्रसिद्ध प्रमुख सुधीर माने सदस्य सुधीर म्हात्रे ,निवास चौधरी , अनिल बोरीटकर, दिनेश तिवारी, संध्या पाटील, वैशाली मोडक‌  ईत्यादी उपस्थित होते शासनाने यांचे मागण्या मान्य करायला पाहिजे  या बंद मुळे सर्व सामान्य जनतेला त्रास होत आहे या बाबतीत तरी शासनाने लक्ष द्यायला पाहिजे.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण