ताकई ते आडोशी रस्त्यासाठी उपोषण ,पंचक्रोशीच्या वतीने बहिणीने केले भाऊरायाला भाऊबीज

 ताकई ते आडोशी रस्त्यासाठी उपोषण ,पंचक्रोशीच्या वतीने बहिणीने केले भाऊरायाला भाऊबीज 







पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
साजगांव / ताकई : १५ नोव्हेंबर,


                साजगाव ते ताकई रोड
या रस्त्याची दुरवस्था निर्माण झाली असून,या मार्गावरून अनेक वहाने तसेच कामगार वर्ग कारखान्यात जात आहे.तसेच शाळकरी मुले याच मार्गावरून प्रवास करीत आहे.त्यांचा प्रवास सुखरुप व्हावा, तसेच या रस्त्याचे काम उत्तम प्रकारे व्हावे यासाठी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.शेखर जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण सुरु आहे एक भाऊ हा रस्त्याचे काम उत्तम प्रकारे व्हावे यासाठी उपोषण करतोय यासाठी महिला वर्गांनी पुढे येवून आज भाऊबीज असल्यामुळे  चींचवली गोहे येथील सौ.करुणा दिनेश पाटील ( खालापूर तालुका अध्यक्ष,अखिल पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया ) जांभळे यांचे औक्षण केले.
                   आज भाऊबीज बहिण भावाच्या प्रेमाच्या वाहता झरा,मग तो मानलेला भाऊ असो की जो भाऊ समाज्यातील बहिणीसाठी सातत्याने तीच्या पाठीशी खंभीरपणे उभे असतो.आज या रस्त्याची अवस्था एकदम बिकट झाली असून या रस्त्याचे काम लवकर होण्यासारखा या रस्त्यामुळे अपघात होवू नये यासाठी बेमुदत उपोषणास साजगाव फाटा येथे उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे.यामुळे महिला वर्गांनी पाठिंबा दिला आहे. 
                झोपलेल्या अधिकारी यांना जाग आण्यासाठी हे उपोषणांचे करण्यात आले आहे.यावेळी या पंचक्रोशीतील महिला वर्गांनी जांभळे यांस पाठींबा दिला आहे.या रस्त्याचे काम लवकरात -लवकर करावे,मात्र यांचे कुणाला सोयर - सुताक नाही,मात्र डॉ. शेखर जांभळे यांनी गेली अनेक आंदोलन करून विविध प्रश्न मार्गी लावले असल्यामुळे या उपोषण पाहून अधिकारी नक्कीच जागे होवून येथिल रस्त्याचे काम मार्गी लावले जाईल अशी चर्चा महिला वर्गामध्ये ऐकण्यांस मिळाली.




 

Post a Comment

0 Comments

खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन