राजिप शाळा वडगांव च्या विद्यार्थ्यांनी बांधले वनराई बंधारे

 राजिप शाळा वडगांव च्या विद्यार्थ्यांनी बांधले वनराई बंधारे, शिक्षक समवेत विद्यार्थ्यांवर कौतुकांचा वर्षाव 




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
वडगांव : २  नोव्हेंबर 
                          
              पावसाळ्यात पडलेले पाणी ओहळ, छोटे कालवे या ठिकाणी काही काल,राहत असते.मात्र ते पुढील काही महिने हे पाणी तेथेच जमा राहावे यासाठी वनराई बंधारे हे महत्वाचे ठरत असते.मात्र तुरळक ठिकाणी वनराई,बंधारे बांधले जात असते.हे गावोगावी बांधले गेले की सरपटणारे प्राणी,पशु,पक्षी,शेतक-याची गुरे यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोया होत असते.या सर्व बाबींचा अभ्यास करून रायगड जिल्हा परिषद शाळा  वडगांव  मुख्याध्यापक सुभाष राठोड यांच्या संकल्पनेतून आणी तालुका कृषी अधिकारी सुनिल निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली,मंडळ कृषी अधिकारी प्रशांत कदम,यांच्या सहकार्याने वनराई बंधारे बांधण्यात आले.

                              शिक्षक विद्यार्थ्यांना वनराई बंधारे कसे असते त्यांचे महत्व काय? हा विषय शालेय मध्ये सातत्याने शिकविला जात असल्यामुळे हा बांधण्यासाठी सिमेंट च्या गोणी मध्ये माती भरून ज्या ठिकाणी पाण्यांचा प्रवाह आहे.त्या ठिकाणी एकावर एक रचण्यात आले.आणी तासात वनराई बंधारे बांधून पूर्ण झाले.हे बंधारे बांधल्यामुळे जमिनीची धूप कमी होते, शिवाय भूजल पातळी वाढण्यांस मदत होते,त्याच वन्य जीव यांचा काही महिने पिण्याच्या पाण्यांचा प्रश्न मार्गी लागत असतो.बंधारे एक मात्र फायदे अनेक असते असे मार्गदर्शन करण्यात आले.

            या शाळेतीळ असलेले शिक्षकांना या सामाजिक उपक्रमांची आवड असल्यामुळे,शिक्षणासमवेत विद्यार्थ्यांना पर्यावरण विषयी आपण काय करू शकता यांचे सुद्धा मोलाचे मार्गदर्शन लाभत असते.जे मोठ्या व्यक्तींना करणे  शक्य होत नाही,ते शाळकरी मुले मोठ्या उत्सहाने समाजसेवेचे काम करीत असल्यामुळे त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.यावेळी  मंडळ कृषी अधिकारी प्रशांत कदम,अंगणवाडी सेविका नीता राऊत,शाळेचे मुख्याध्यापक - सुभाष राठोड,विषय शिक्षिका सरस्वती कवाद, स्वयं सेविका निकिता गडगे व साक्षी जांभुळकर,पोस्टमन सगर सर तसेच ग्रामस्थ व माजी विद्यार्थी मयुर ठोंबरे तसेच शाळेचे सर्व विद्यार्थी  या वनराई बंधारे बांधण्यासाठी उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments

बेचकीच्या अचुक लक्षवेध ठरला तिसरीचा विद्यार्थी  सोहम पवार