तुमचे एक मत म्हणजे गावाचा विकास,तरुणांना,रोजगार,महिला वर्गांच्या हाताला काम

 तुमचे एक मत म्हणजे गावाचा विकास,तरुणांना,रोजगार,महिला वर्गांच्या हाताला काम,महाविकास आघाडीचे शब्द म्हणजे काळ्या दगडावरील पांढरी रेषा 




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
माजगांव / आंबिवली ३ नोव्हेंबर,

                 गावाचा विकास हा आपल्या मतदानावर अवलंबून असतो.कारण प्रत्येकांनी पक्ष पाहून चालत नसतो,आपल्या गावाचा विकास व्हावे असे प्रत्येकाला वाटत असते.मात्र वेळ निघून गेल्यावर आपल्यावर पछाताप करण्यांची वेळ येते.मात्र या निवडणूकीत माणूस पाहून मतदान करा,कोणत्याही भावनिक शब्दाला,आमिषाला बळी पडू नका. मात्र माणूस पाहून मतदान केल्यांस नक्कीच तुमच्या समवेत कुटुंब सुखी राहील त्यासाठी आपल्या हाताला रोजगार महत्वाचा आहे.मला माहित,कि रोजागर नसेल तर काय होइल यांचा आभ्यास आहे. एक सुशिक्षि महिला थेट सरपंच पदासाठी उभे आहे. ते तुमचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी,या निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे.यामुळे तुम्ही तुमच्या मनाला विचारा, आभ्यास करा अजून वेळ गेली नाही. परिवर्तन घडवयांचे असेल तर फक्त महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही.
     

       

    थेट सरपंच म्हणून उभी असलेली दिपाली नरेश पाटील, कर्तुत्वान महिला म्हणून आपण तीच्या कडे पाहिले जाते.त्याच बरोबर नरेश पाटील,यांनी गावाच्या विकासासाठी स्वताला पूर्णपणे झोकून दिले.या गावामध्ये त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले, विविध शासकीय फंडातून त्यांनी निधी घेवून गावाच्या विकासात भर पाडली आहे. आपल्या पोटाची खळगी भरण्यांचा विचार न करता समाज्यासाठी झटणारा तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणून एक वेगळीच अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. मात्र हे सर्व तुमच्या मनावर पुर्णपणे आधोरेखित करा,कारण विकासांची संधी येत असतांना आपण दगड न मारता त्यांचे फुलांने स्वागत करा तरच आपण पाहिलेले स्वप्न पुर्ण होइल,
     



     

   निवडणुकीच्या प्रचारांची तोफा काही तासात थंड होत असतांना,मतदार राजा आपण थंड होता कामा नये,कारण पाच तारखेला मतदान आणी सहा तारखेला निर्णय,यामुळे आपण जागृत रहावे,कारण या निवडणूकीच्या रिंगणात उभे राहत असतांना,आम्ही जनतेच्या मनामध्ये असलेले अनेक प्रश्न असून ते मार्गी लावण्यांचे स्वप्न पहात आहोत. यामुळे तुम्ही जे स्वप्न पाहिले ते आम्ही सत्यात उतरविल्या शिवाय शांत बसणार नाही,आम्हाला सरपंच म्हणून आपण निवडून आणणार असा आमचा विश्वास आहे.मात्र मी एकटा सरपंच नाही होणार तर प्रत्येक मतदार राजा माझा सरपंच असणार आहे. आपण सक्षम आहोत महाविकास आघाडीला परिवर्तन निर्माण करण्यासाठी.
             

    या निवडणुकीत थेट सरपंच म्हणून   
दिपाली नरेश पाटील,क्रमांक १ मधून वर्षा रमेश जाधव यांस छताचा पंखा,तसेच प्रांजळ प्रदिप जाधव - यांस कंगवा,तसेच मधुकर गायकवाड कपाट त्याच बरोबर त्याच बरोबर अर्पणा यशवंत शिंदे प्रभाग क्रमांक ३ मधुन छताचा पंखा म्हणून चिन्ह मिळाले आह. राजेश शिवराम पाटील प्रभाग क्रमांक ३ मधून छताचा पंखा चिन्ह मिळाले आहे. वैशाली नितिन महाब्दि - शिटी ,वंदना सुधाकर महाब्दि - टोपली,प्रभाग क्रमांक २ मधून शशिकांत गजानन पाटील,तसेच सरिता कमलाकर वाघे यांची प्रभाग क्रमांक २ मधून बिनविरोध निवड असे उमेद्वार असून आपण आम्हास बहुसंख्येने मतदान करुन निवडून द्याल कारण तुम्ही दाखविलेला विश्वास म्हणजे विजयांचे इंद्रधनुष्य होय.

Post a Comment

0 Comments

खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन